Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

डे ट्रेडींग

डे-ट्रेडिंग अथवा अल्पकालीन ट्रेडिंग हा पूर्णवेळ व्यवसाय आहे. यात येणारे बहुतेक लोक हे स्वताचा व्यवसाय अथवा नोकरी करणारे असतात. फोनवरून ऑर्डर्स देऊन दलालाच्या सहाय्याने यातून आपण कमी कालावधीत भरपूर नफा आपण कमवू शकू असा त्यांना विश्वास असतो. परंतु हा गैरसमज आहे कारण डे ट्रेडिंग अथवा अल्पकालीन ट्रेडिंगमध्ये कमी मार्जिन भरून तुम्ही फार मोठी जोखीम घेत असता. जर एखादा सौदा चुकला तर तुमचे संपूर्ण भांडवल गायब होण्याची शक्यता यात असतो. 

शेअर बाजारातील धोका टाळण्यासाठी तुम्हाला पूर्णवेळ म्हणजे सकाळी ९ ते दुपारी ३.३० पर्यंत संगणकासमोर अथवा दलालाच्या कार्यालयामध्ये बसावे लागते व या क्षेत्राचा काही काळ अनुभव घेतल्यावरच तुम्ही यात उतरू शकता. जर तुम्हाला पूर्ण वेळ व्यवसाय म्हणून या क्षेत्रात प्रवेश करायचा असेल तरच तुम्ही या पर्यायाचा विचार करा. यासाठी प्रथम तुम्ही ‘तांत्रिक विश्लेषण’ या विषयाचे प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. 

 

- प्रवीण धोपट

3.625
सरासरी 3.6 (16 votes)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation