Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

बाजाराचा कल आणि खरेदी विक्री

जे इंट्रा-डे वा अल्पकालीन ट्रेडर आहेत त्यांनी बाजारचा कल ज्या दिशेचा आहे त्या दिशेने आपले खरेदी अथवा विक्रीचे निर्णय घ्यावेत. म्हणजे जर बाजार वर जात असेल तर खरेदी करावी व जर बाजार खाली जात असेल तर विक्री करावी. याउलट दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी प्रवाहाच्या विरूद्ध दिशेने विचार करायचा आहे. म्हणजे जेव्हा बाजारात विक्रीचा गजर होत असतो तेव्हा स्वस्त झालेले चांगल्या कंपन्यांचे समभाग खरेदी करावेत. व जेव्हा बाजारात खरेदीचा जोर असतो व बाजार जबरदस्त वेगाने वर जात असतो तेव्हा आपल्याकडील फायद्यातील कंपन्यांची विक्री करावी. 

खरेदी-विक्री कधी करावी व कोणत्या कंपनीचे समभाग खरेदी करावेत याविषयी तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास मुलभूत चिकित्सा पद्धती (फंडामेन्टल एनालिसिस) या विषयाचा सखोल अभ्यास करणे जरुरीचे आहे. त्याचप्रमाणे तांत्रिक विश्लेषणाच्या अनेक पद्धती आहेत त्या ही समजून घेणे आवश्यक ठरेल.    

 

- प्रवीण धोपट

3.75
सरासरी 3.8 (4 votes)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation