Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

अकाऊंटींगचा कार्यालयीन वापर

कोणत्याही कार्यालयाचे काम अकाउंटशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. कोणत्याही व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी अकाउंट हा मूलभूत पाया आहे. हा पाया पक्का असल्याशिवाय व्यवसायाची भरभराट केवळ अशक्य आहे. हा पाया कच्चा राहिला, तर अल्पावधीतच व्यवसाय बंद करण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे, प्रत्येक कार्यालयात अकाउंटसाठी डेडिकेटेड स्टाफ असतो. व्यवसायातील इतर महत्त्वाची कामे करण्यात व्यस्त असलेल्यांकडेच अकाउंटिंगचे काम कधी दिले जात नाही. त्यातून, व्यवसायाचे नुकसान होण्याचीच अधिक शक्यता असते. त्यामुळे, अकाउंटिंगचा कार्यालयीन वापर त्यातील जाणकार व्यक्तींकडून करून घेतला जातो. 

प्रत्येक व्यवसायाच्या उद्दिष्टानुसार कार्यालयातील अकाउंटिंगचे हेतू हे देखील वेगवेगळे असतात. जसे की, एखाद्या उद्योग-व्यवसायासाठी नफा झाला वा तोटा हे शोधण्यासाठी अकाउंटिंगचा वापर केला जातो. ना नफा, ना तोटा या तत्त्वावर चालणा-या संस्थांमार्फत सरप्लस वा डेफिसिट झाला, हे ताडण्यासाठी अकाउंटिंगचा केले जाते. त्याशिवाय, आपल्याकडे असलेल्या मालमत्ता (असेट्स) कोणत्या आणि आपण कोणाला देणी (लायबिलिटी) लागतो, याची माहितीही अकाउंटिंगमुळेच होऊ शकते. सरकारच्या नियमांनुसार प्राप्तिकर, विक्रीकर, सेवाकर भरण्यासाठी देखील अकाउंटिंगशिवाय इतर कोणतेही माध्यम वापरले जात नाही. त्यामुळे, पैशाची कोणतीही देवाण-घेवाण, मग ती रोख रक्कम स्वरूपात असो वा, धनादेशाच्या रुपात किंवा इतर कोणत्याही स्वरूपात, त्याचे अकाउंटिंग केले नाही, तर प्रत्येक कार्यालयात गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. 

प्रत्येक कार्यालयात अकाउंटिंगचा वापर वेगवेगळ्या स्वरूपात होताना दिसतो. अलीकडच्या काळात संगणकाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होत असल्याने अकाउंटिंगसाठी देखील उपयुक्त सॉफ्टवेअरचा वापर होताना दिसतो. बहुतेक कार्यालयांमध्ये, कंपन्यांमध्ये, स्वयंसेवी संस्थामध्येदेखील दैनंदिन एन्ट्री आणि पोस्टिंग सॉफ्टवेअरद्वारेच केले जाते. काही छोट्या स्वरूपाच्या संस्थांमध्ये मात्र अद्याप जुन्या पद्धतीने जनरल आणि लेजर अशा स्वरूपात बुक किंपिंगद्वारे अकाउंटिंग केले जाते. प्रत्येक व्यवसायाच्या, संस्थांच्या सोयीसाठी प्रोफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्सशीटचे वेगवेगळे प्रकार तयार करण्यात आले आहेत. त्याच्यामध्ये आपल्या व्यवसायाशी संबंधित सर्व एन्ट्री केल्या की, आपोआप संस्था, व्यवसाय याची नेमकी माहिती समजू शकते. 

छोट्या व्यवसाय किंवा संस्थांमध्ये अकाउंटसाठी देखरेख करणारी एखादी व्यक्ती असते. जसा व्यवसाय किंवा संस्थेचा विकास, भरभराट होत जाते, तशी अकाउंटिंगसाठी देखरेख करणा-यांची संख्या वाढत जाते. परंतु, अकाउंटिंगशिवाय कार्यालय याचा विचारच केला जाऊ शकत नाही. 

- मनीषा भावे

0
No votes yet
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation