Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

आयकर म्हणजे काय ?

आयकर म्हणजे काय ?
सौजन्य -taxmantra.com

भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयांतर्गत, महसूल विभागात ‘आयकर’ खात्याचा समावेश होतो.  त्याअंतर्गत व्यक्ती, संस्था, कंपन्या, इत्यादींच्या आर्थिक व्यवहारांवर पारदर्शकपणे लक्ष ठेवले जाते. प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर या दोन प्रकारांमध्ये कराची विभागणी होते. आयकर याचा प्रामुख्याने उल्लेख प्रत्यक्ष करात केला जातो. उत्पन्नाची मर्यादा पाहून आयकर भरणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्ती, कंपनी आणि संस्था यांना कायदेशीररित्या आयकर भरणे क्रमप्राप्त आहे. 

इन्कम टॅक्स अॅक्ट, १९६१ नुसार वार्षिक उत्पन्नावर लावलेला कर म्हणजे ‘आयकर’ होय. हा कर ०२ एप्रिल १९६२ पासून लागू आहे. इन्कम टॅक्स अॅक्टच्या नियमावलीनूसार लागू करण्यात येणाऱ्या एकूण वार्षिक उत्पन्नावर कर स्वरूपात जमा होणारी रक्कम ‘आयकर’ म्हणून गणली जाते.  आर्थिक वर्ष २०१५-१६  ला  आयकर भरण्यासाठी उत्पन्नाची मर्यादा रुपये २,५०,०००/- पर्यंत ठेवली आहे.  करपात्र उत्पन्नाची मर्यादा रुपये २,५०,०००/- (वयोमर्यादा:- ६० वर्षाखालील) , तर ज्येष्ठ नागरिकांसाठी रुपये ३,००,०००/- प्रती वर्ष एवढी आहे (वयोमर्यादा:- ६० वर्षावरील व ८० वर्षाखालील). तसेच वय वर्ष ८० असलेल्या उच्च ज्येष्ठ नागरिकांसाठी रुपये ५,००,०००/- प्रती वर्ष सूट आहे.

उदाहरणार्थ,  श्री. रमेश पाटिल यांचे दरमहा वेतन रुपये २५,०००/- आहे. तर त्यांचे  एकूण वार्षिक उत्पन्न हे रुपये ३,००,०००/- इतके होईल. तर त्यांना वार्षिक आयकर रुपये ५०,०००/-   या रकमेवर भरावा लागेल. आपल्या उत्पन्नाची शहानिशा करून कर भरण्याची परवानगी आयकर विभागाने वेळोवेळी दिलेली आहे. 

या लेखामध्ये आम्ही तुम्हाला आयकर खात्याचे काम, आयकर भरताना लागणारी कागदपत्रे, आयकराचे विविध अर्ज, इ. विषयी माहिती देणार आहोत. त्यासाठी डाव्या बाजूवरील लिंक्सवर क्लिक करा.  

 

- महेश मोरे
अकाउंटंट 
प्रथम इन्फोटेक फाउंडेशन,
पत्ता – ७८/ए,कामगार नगर,
एस.जी.बर्वे मार्ग, कुर्ला (पूर्व)
मुंबई – ४०० ०२४
इ मेल – 
mahesh.more@pif.org.in
वेबसाईट -  
 www.pif.org.in


 

3
सरासरी 3 (2 votes)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation