Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

कर भरणा

आपल्याला मिळत असलेले पैसे किंवा आपण उपभोगत असणारी सेवा याकरिता दर वर्षाला काही ठराविक रक्कम राज्य अथवा केंद्र सरकारला कर म्हणून देणे बंधनकारक असते. मिळकत कर, कॅपिटल गेन कर, कॉर्पोरेट कर, मालमत्ता कर, ट्रान्सफर कर, वेल्थ कर, वस्तू व सेवांवरील कर, विक्री कर आणि इतर कर हे कराचे प्रकार आहेत. विविध क्षेत्रात काम करणाऱ्या आणि सेवा घेणाऱ्या प्रकारांमध्ये कर भरावा लागतो. 

पूर्वी कर भरण्यासाठी विविध विभाग शहराच्या अनेक भागामध्ये होते. त्या ठिकाणी जाऊन दिलेल्या वेळेच्या पूर्वी कराची रक्कम भरली  जात होती. परंतु आता आधुनिक तंत्राच्या सहाय्याने मेलच्या माध्यमातून कर भरता येतो. 

onlineservices.tin.nsdl.com या संकेतस्थळावरून घरबसल्या आपल्याला कर भरणा करणे सहज शक्य झाले आहे. कर भरला नाही तर संबंधित विभागाकडून आपल्याला पुढची तारीख देऊन नोटीस पाठवली जाते. त्यानंतर कर भरणा झाला नाही तर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळच्या वेळी कर भरणा करणे फायदेशीर ठरते.

मिळकत ‘करा’संदर्भात नियम

सर्व करांच्यामध्ये मिळकत (इनकम) कर अति महत्वाचा समजला जातो. मिळकत कर नियम १९६२ मधील ६ डीडी प्रमाणे  महिन्याला रुपये २०,००० किंवा त्यापेक्षा जास्त वेतन असणाऱ्या  व्यक्तीस मिळकत कर बंधनकारक असतो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा क्लोझमध्ये नमूद केल्याप्रमाणे इतर कोणत्याही सहकारी बँकेत कर भरणा करता येतो.


- प्रथमेश नारविलकर

0
No votes yet
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation