Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

कर भरणे का आवश्यक आहे ?

कर भरणे का आवश्यक आहे

वेगवेगळ्या कारणांसाठी आपण प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर भरीत असतो. केंद्र शासन, राज्य शासन, आणि स्थानिक स्वराज्य संस्था करा आकारणी करीत असतात. आपण जो करा भरतो तो शासनाच्या यंत्रणेद्वारे शासनाच्या तिजोरीत जमा होत असतो. या कराच्या माध्यमातून जमा झालेली रक्कम विकासकामांसाठी खर्च केली जाते. रस्ते बांधणे, शिक्षण आणि आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध करून देणे, पाणी आणि वीज पुरवठा यासारख्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या  कामासाठी पैशाची आवश्यकता असते त्याचप्रमाणे सामाजिक तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शासन ज्या विविध कल्याणकारी योजना राबवीत असते त्यासाठे लागणारा पैसा हा शासन कर आकारणीतून जमा करीत असते. 

शासनाचा दैनंदिन खर्च, सर्व शासकीय कर्मचारी, सैन्य दल, पोलीस, अधिकारी वर्ग यांचे वेतन,सैन्य तसेच पोलीस दलासाठी शस्त्र खरेदी  आदि कारणांसाठी  लागणारा सर्व खर्च कराद्वारे प्राप्त होणा-या पैश्यातून भागवला जातो.लोकांनी  कराच्या माध्यमातून शासनाकडे जमा केलेला पैसा शासन लोकांसाठीच  खर्च करत असते. कराच्या माध्यमातून भरलेला प्रत्येक रुपया हा राष्ट्र उभारणीच्या कामासाठी मूल्यवान आहे.  त्यामुळे कर भरणे म्हणजे एक प्रकार राष्ट्रसेवाच करणे होय.

 

- अमोल वाघमारे 

0
No votes yet
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation