Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

या विभागात

चांगल्या क्रेडीट नोंदी ठेवणे

 क्रेडीट नोंदी

चांगल्या क्रेडीट नोंदी ठेवण्यासाठी उपयुक्त बाबी.

  • प्रत्येक महिन्याला संपूर्ण बाकी भरा.
  • वेळेत पैसे भरा.
  • मासिक स्टेटमेंट तपासा.
  • क्रेडीट कार्डाची किफायतशीर खरेदी करा.
  • ‘कर्ज आणि मिळकतीचे गुणोत्तर’ न्यूनतम ठेवा.
  • खूप कर्ज किंवा क्रेडीट कार्डांसाठी अर्ज करू नका. 

प्रत्येक महिन्याला संपूर्ण बाकी भरा
तुम्ही अर्धे किंवा अत्यंत कमी पैसे भरू शकत नसाल तर तुम्ही जितके वापरले त्यापेक्षा कितीतरी अधिक तुम्हाला फेडावे लागतील. आणि अजिबातच फेडले नाही तर याचा अर्थ तुम्ही तुमच्या अर्थसंकल्पानुसार चालत नाही, असा आहे. 

वेळेत पैसे भरा
जर तुम्ही वळेत पैसे भरले तर महागडया विलंब फी टाळू शकाल. बिल हातात पडल्यावर लगेचच ते भरले तर मोठे व्याज टाळू शकाल. काही कंपन्या उशिरा केलेल्या पैसे फेडीवर मोठा व्याज दर आणि विलंब फी लावतात. 

मासिक स्टेटमेंट तपासा
तुम्ही जे खर्च केलं त्याचेच पैसे तुम्ही फेडत आहात याची खात्री करून घ्या. जे तुम्ही केलंच नाही ते जर तुमच्या नोंदीत आढळलं तर लगेच क्रेडीट कार्ड कंपनीला कळवा. 

क्रेडीट कार्डाची किफायतशीर खरेदी करा
१५ टक्के किंवा त्याहून कमी व्याज दर असलेलं क्रेडीट कार्ड घ्या. दर जितका जास्त तितकं तुम्हाला अधिक फेडावं लागेल. वार्षिक फी सह नसलेलं कार्ड घ्या. क्रेडीट मर्यादा संपल्यावर दंड म्हणून किती फी लावली जाते हे ही पहा.

‘कर्ज आणि मिळकतीचे गुणोत्तर’ न्यूनतम ठेवा 
तेच कर्ज उचला जे तुम्हाला फेडणं शक्य आहे. तुमची मिळकत जितकी जास्त तितकं तुमचं कर्ज जास्त असू शकेल. गाडी किंवा घरासाठी कर्ज घेताना ते देणारा या गुणोत्तराचा, बिल भरल्यानंतर तुमच्याकडे किती बाकी राहतात या बाबींचा विचार करेल.   

खूप कर्ज किंवा क्रेडीट कार्डांसाठी अर्ज करू नका
ही माहिती तुमच्या क्रेडीट नोंदींवर असेल आणि कदाचित तुमची क्रेडीट पात्रता कमी करू शकेल. तुमच्यावर अनेक कर्ज असतील तर तुम्ही त्यांचा लहानसा भागच नेहमी फेडत बसाल. संपूर्ण कर्ज फेडू शकणार नाही.

0
No votes yet
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation