Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

क्रेडीटसाठी पात्रता

क्रेडीटसाठी अर्ज

क्रेडीटसाठी अर्ज करताना तुम्हाला अनेक प्रश्नांचा सामना करावा लागेल. तुमची मिळकत आणि खर्च किती, किती दिवस नोकरी करीत आहात, तुमची काही बचत आहे का, घर, गाडी गुंतवणूक अशी काही तुमची स्थावर मालमत्ता आहे का  क्रेडीट कार्ड देणारा विचारेल. तुमची उत्तरं आणि तुमचं क्रेडीट रिपोर्ट यावर तुम्हाला लोन किंवा कर्ज द्यायचं की नाही ते ठरवलं जाईल. 

तुम्हाला स्वत:लाच काही प्रश्न विचारावे लागतील. तुम्हाला कर्ज कशासाठी हवं आहे? तुम्ही मासिक पैसे भरू शकाल का? तुम्हाला फी फेडणं शक्य आहे का? तुमच्या आधीच कर्ज असेल तर आणखी पैशांची गरज आहे का? या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडे तयार असली पाहिजेत. 

क्षमता
म्हणजे आताची आणि भविष्यातील पैसे फेडण्याची ऐपत.दुस-या शब्दात तुमची मिळकत. क्रेडीट कार्ड देणारे तुमची सर्व मिळकत, पगार आणि तुम्ही किमान एक वर्षभर एकाच नोकरीत टिकून आहात हे पाहतील. तुमच्या मिळकतीच्या मानाने तुमच्यावर कर्ज किती आहेत ते ही तपासतील. 

सुरक्षेची हमे (कोलॅटरल)
तुमची बचत आणि स्थावर मालमत्ता या गोष्टी कर्जाच्या सोयीसाठी  पहिल्या जातील यालाच कोलॅटरल किंवा सुरक्षेची हमी म्हणतात. काही दात्या कंपन्या, खूप कमी क्रेडीट कार्ड कंपन्या आणि CONSUMER INSTALLMENT LOAN PROVIDER कर्ज फेडण्यासाठी तुमच्या इतर स्त्रोतांकडे पाहतील. 

चरित्र
हे तुमच्या कर्ज आणि बिल फेडण्याच्या पार्श्वभूमीवर पाहिलं जाईल. तुमची पार्श्वभूमी चांगली असेल, कर्ज वेळेत भरली असतील तर तुम्हाला नवे क्रेडीट दिले जाईल. 

3
सरासरी 3 (2 votes)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation