Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

क्रेडीट कार्डाचे प्रकार

क्रेडीट कार्ड

क्रेडीट
खासकरून क्रेडीट कार्ड मोठया रकमेपेक्षा सोयीस्कर आणि कोणत्याही आपत्तीच्या काळात फायदेशीर ठरतात. लहान आणि मोठया अशा दोन्ही खरेदीत ते वापरता येतात. काही वेळा ३० किंवा ४५ दिवसांच्या आत तुम्हाला सर्व पैसे फेडावे लागतात. पण अनेकदा वेळही लागू शकतो. अनेक लोक बँक खात्याच्या जोडीने क्रेडीट कार्डचा वापर करतात. जरी हा आपल्या संस्कृतीचा जगण्याचा भाग असला तरी अशाप्रकारे उधारीचा वापर करणे ही तुमच्या आर्थिक पार्श्वभूमीसाठी वाईट गोष्ट आहे. क्रेडीट खाली दिलेल्या अनेक प्रकारात उपलब्ध आहे.

क्रेडीट कार्डस
क्रेडीट कार्ड  क्रेडीटचा सामान्य प्रकार आहे. जो अनेकांना गोत्यात आणतो. शॉप अकाऊंटस ही क्रेडीट कार्ड असतात. कपडे, स्टिरीओ, टी. व्ही., दागिने, महागडं खाणं, भेटवस्तू अशा आपल्या आवाक्यात नसलेल्या गोष्टी क्रेडीट कार्डावर खरेदी करू नयेत. उशिराने पैसे भरणे किंवा पैसेच न भरणे या दोन्ही गोष्टीनी तुमच्या क्रेडीट रिपोर्टवर परिणाम होतो. एखाद्या गोष्टीसाठी पैसे नसतील तर ते लगेच देण्यासारखे असेपर्यंत ते घेऊ नका.

हायर पर्चेस (हफ्त्यांवर मिळणा-या वस्तू)
टेलीविजन आणि महागडं फर्निचर यासारख्या वस्तूंवर भाडे खरेदी दिली जाते. या वस्तू बचत करून विकत घ्याव्यात. तरीही तुमची गरज म्हणून त्या भाडे खरेदीवर घेतल्या तरी जोपर्यंत तुम्ही त्याचे पैसे फेडत नाही तोपर्यंत ती वस्तू तुमची नसते हे लक्षात ठेवा. अर्धे पैसे भरले आणि पुढचे भरू नाही शकलात तर तुमची वस्तूही जाते आणि भरलेले पैसेही. वस्तू खरेदी करण्यापेक्षा भाडे खरेदीवर अधिक पैसे जातात हे लक्षात ठेवा. 

आधी खरेदी मग पैसे (ले बाय) 
बरीचशी दुकानं बहुतेकदा कपडयांची दुकानं ले-बाय पद्धतीने खरेदी करण्याची संधी देतात. काही रक्कम आधी दिली जाते व उरलेली रक्कम नंतर देण्याची अट असते. पण पुर्ण रक्कम भरल्याशिवाय तुम्ही ते घरी घेऊन जाऊ शकत नाही. बजेटपेक्षा जास्त पैसे तुमच्याजवळ नसतात तेव्हा हे फारच धोक्याचे असते. पण जर माहित असेल की येत्या एक –दोन महिन्यात त्या महागडया कपडयांचे पैसे आपण परत देऊ तर हे फायद्याचे ही ठरते. 

0
No votes yet
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation