Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

क्रेडीट कॅश

क्रेडीट कॅश म्हणजे काय
एखादी वस्तू खरेदी करताना तुमच्याकडे आयत्या वेळी पैसे नसतात तेंव्हा तुम्ही क्रेडीट कार्डावर खरेदी करू शकता. कार्ड देणारी कंपनी एक ठराविक रक्कम तुम्हाला खर्च करायला देते आणि त्यावरचा अतिरिक्त खर्च करण्याची मुभाही देते. हे पैसे दर महिन्याला नेमून दिलेल्या तारखेच्या आधी भरावेत. या तारखेच्या आधी नाही भरले तर तुम्हाला आर्थिक आकारणी होते, व्याज लावलं जातं. बरेचसे क्रेडीट कार्ड परताव्यासाठी ६ ते १२ महिन्याचा कालावधी देतात आणि अतिरिक्त किंवा सर्वच रकमेवर व्याज आकारतात. 

क्रेडीट कार्ड कितीही आवश्यक असले तरी त्यांचे धोकेही तितकेच आहेत. आर्थिक स्थिती चांगली असलेले लोकही कधी कधी या क्रेडीट कार्डांच्या कचाट्यात सापडतात. लोक विचार न करता आपले क्रेडीट कार्ड वापरत राहतात आणि त्यात गुरफटतात. ते फक्त लहान रक्कम फेडू शकतात. याचाच परिणाम मोठं व्याज लागण्यात होतो.

5
सरासरी 5 (1 vote)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation