Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

या विभागात

बँक मोर्गेज

मॉर्गेज चा अर्थ

मॉर्गेज म्हणजे एखादी वस्तू गहाण ठेवणे होय. जेव्हा आपल्याला कर्जाची गरज असते, अशा वेळी बॅंक कर्ज उपलब्ध करून देते. पण त्यासाठी तुम्हाला जमीन घर किंवा यासारखी एखादी प्रॉपर्टी(मालमत्ता) बँकेकडे मॉर्गेज(गहाण) म्हणजे फक्त तुमच्या कर्जाची परत फेड व्यवस्थित व्हावी, यासाठीची अशुरीटी असते.

मॉर्गेज केंव्हा घेऊ शकता ?

त्यासाठी तुमच्याकडे स्वतःच्या नावावर काही प्रॉपर्टी असणे आवश्यक असते, म्हणजे त्यासाठी आवश्यक कागद पत्रे तुमच्या नावावर असणे आवश्यक आहे तरच बॅंक तुम्हाला मॉर्गेज द्यायला तयार होतात.

मॉर्गेज चे दोन प्रकार आहेत

रिपेमेन्ट मॉर्गेज

मॉर्गेजच्या दोन प्रकारांपैकी कुठल्याही एका प्रकारे तुम्ही मॉर्गेज रिपेमेन्ट मॉर्गेजपेमेंट बँकेला करावे लागते. त्यासाठी बॅंक तुम्हाला मासिक हफ्ते ठरवून देते, ती रक्कम दर महिन्याला भरावी लागते .मॉर्गेजवर व्याज आकारणी  दर महिन्याल भरण्यात येणा-या रकमेतून बॅंक व्याज वजा करत राहते आणि जर तुम्हाला एकदम मुद्दल मधून रक्कम वजा करायची असेल, तर त्यासाठी वेगळी मोठी रक्कम भरणे गरजेचे आहे अशा प्रकारे या दोनही प्रकारात तुम्ही कर्ज घेऊ शकता. जर तुम्ही बँकेला पैसे ठराविक मुदती मध्ये परत केले नाहीत किंवा ठरवून दिलेले हप्ते वेळेत भरले नाहीत, तर बॅंक तुम्हाला नोटीस देते आणि त्या नंतरही तुम्ही पैसे भरले नाहीत तर बॅंक तुम्ही मॉर्गेज (गहाण) ठेवलेली मालमत्ता जप्त करते.

इंटरेस्ट ओन्ली मॉर्गेज

आपण ठराविक काळामध्ये मॉर्गेज घेऊ शकता त्यासाठी घेतलेल्या रकमेचे प्रॉपर्टी बॅंक स्वतः च्या ताब्यात घेते. शक्यतो मोर्गेज घेणे टाळावे पण जर आवश्यक  असेल तर लवकरात लवकर त्याच्या कचाट्यातून सुटनेच योग्य कारण जरी ही गहाणवट सावकारी पद्धतीची नसली तरी व्याज ची रक्कम वाढतच जाते.

 

- अनघा पाटील

 

4
सरासरी 4 (1 vote)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation