Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

गुंतवणूकविषयी मदत

गुंतवणूक करताना उगीचच घाबरण्याची गरज नाही. तुम्हाला सहाय्यकारी ठरतील असे अनेक स्त्रोत आहेत. व्यावसायिक मदतीशिवाय तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर आधी सखोल अभ्यास करा. इंटरनेटवर अनेक वेबसाईट आहेत ज्या तुम्हाला मदत करतील. 

तुम्ही स्वत: करणार आहात तर...
सुरुवात करण्यासाठी इंटरनेटवर अनेक विनामूल्य आणि सहाय्यकारी वेबसाईटस आहेत. तुम्ही थोडं शोधलं तर तुम्ही चलाख गुंतवणूकदार होऊ शकाल. वस्तुस्थिती जाणणे ही गुंतवणूकीची किल्ली आहे. अधिक माहिती तुम्ही सार्वजनिक ग्रंथालयातून, पुस्तकाच्या दुकानातून किंवा वर्तमानपत्रातून मिळवू शकता. आर्थिक नियतकालिकं आणि वर्तमानपत्रातून अधिक माहिती मिळवू शकता. 

गुंतवणूक क्लबचे सदस्य व्हा
एका गटाच्या रुपाने गुंतवणूक करण्यातून शिकताही येतं आणि हे फार मजेशीरही असेल. संपूर्ण देशभर असे क्लब्स आहेत ज्याचे तुम्ही सदस्य होऊ शकता. गटाने गुंतवणूक केल्यामुळे तुम्ही एकत्रितपणे चर्चा करून निर्णय घेऊ शकता. या क्लबची मासिक वर्गणी असते. एक संघ म्हणून शिकण्यासाठी, गुंतवणूक करण्यासाठी आणि काही अटीतटीचे निर्णय घेण्यासाठी गुंतवणूक क्लब हे चांगलं माध्यम आहे.

स्टॉक ब्रोकरसह काम करणे
व्यावसायिक लोकांसोबत काम करणे हा दुसरा मार्ग आहे. स्टॉक ब्रोकरना स्टॉक मार्केट मध्ये खरेदी विक्रीचे व्यवहार करण्याचा परवाना मिळालेला असतो. मार्केट कसं चालतं आणि दूरगामी गुंतवणूक कशी करता येईल या विषयी निर्णय घ्यायला तो तुम्हाला मदत करेल. तुम्ही एखादा स्टॉक विकला की त्यातला एक ठरलेला भाग त्याला मिळेल. यालाच ब्रोकरेज (कमिशन किंवा दलाली) म्हणतात. 

प्रशिक्षण घ्या
तुमच्या परिसरात उच्च शिक्षण देणारी एखादी संस्था आहे का पहा. तिथे तुम्ही गुंतवणूक कशी करता येईल या विषयी शिकू शकाल. असे प्रशिक्षण तुम्हाला ऑनलाईन ही मिळेल. 

0
No votes yet
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation