Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

कंपनी सेक्रेटरी:करीयरची संधी

कंपनी सेक्रेटरी:करीयरची संधी
सौजन्य -www.hindustantimes.com

कंपनी कायदा, १९५६ नुसार पाच कोटींहून अधिक भागभांडवल असलेल्या प्रत्येक कंपनीने पूर्णवेळ कंपनी सेक्रेटरी (सी.एस.) नेमणे अनिवार्य आहे.  कंपनीचे मालक हे भागधारक असतात आणि ते कंपनीचे व्यवहार व कारभार पाहण्यासाठी संचालक मंडळाची नेमणूक करतात. या संचालक मंडळाला कंपनी कायद्यातील नियमानुसार व्यवहार सुरळीतपणे पार पाडण्यासाठी मदत करतो तो कंपनी सेक्रेटरी

कंपनीचे कामकाज हे त्या त्या देशातील कायद्याने चालत असते. त्यासाठी विविध कायदेशीर बाबीचे ज्ञान आणि भान असणे आवश्यक असते. पब्लिक लिमीटेड कंपनी, प्रायवेट लिमीटेड, कंपनीची नोंदणी, शेअर बाजारातील नोंदणी, उद्योगसमूहाचे विलिनीकरण, आयकर, विक्री कर, कंपनी संबंधित वेगवेगळ्या प्रकारचे कर, इ. महत्वाच्या गोष्टी कंपनी सेक्रेटरीच्या कार्यक्षेत्रात येतात. कंपनीच्या कायदेशीर प्रक्रियेची जबाबदारी कंपनी सेक्रेटरीची असते. दैनंदिन व्यवहारांसह काँट्रॅक्ट कायदा, वाणिज्य विषयक अभ्यास यांची अद्ययावत माहिती कंपनी सेक्रेटरीला असते. 

विद्यार्थ्याला सी.एस. होण्यासाठी भारतातील द इन्स्टिटय़ूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडियाच्या शाखेत प्रथम नोंदणी करावी लागते. आय.सी.एस.आय.च्या विविध शहरात शाखा आहेत.    

कंपनी सेक्रेटरी पदास प्रचंड आदर, सन्मान व प्रतिष्ठा असते. या लेखात तुम्हाला कंपनी सेक्रेटरीमधील संधी, आवश्यक गुण, कामाचे स्वरूप,आदीं विषयी माहिती देणार आहे. त्यासाठी डाव्या बाजूवरील लिंक्सवर क्लिक करा.    

- प्रा. गजानन नेरकर
कंपनी सेक्रेटरी
संचालक – सक्सेस प्रोफेशनल अॅकॅडमी,
करीअर मार्गदर्शक 
संपर्क – ९८९०६६६७६५
इ मेल - 
gajanannerkar@gmail.com

 

 

4
सरासरी 4 (1 vote)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation