Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

व्यवसायाची पूर्वतयारी

व्यवसायाची पूर्वतयारी

परीक्षेच्या दृष्टीने केला जाणारा अभ्यास असो, वा नव्याने हाती घेतलेले किंवा दैनंदिन असे कोणतेही कार्य असो, त्यासाठी पूर्वतयारी हा एक अविभाज्य घटक आहे. कारण, पूर्वतयारी केल्यानंतर जे साध्य करायचे आहे, ते साध्य करणे सोपे जाते. मग एक उत्तम उद्योजक होण्याचे स्वप्न रंगवित नवखा उद्योजक नव्याने सुरूवात करू पाहत असलेला एखादा व्यवसाय तरी पूर्वतयारीपासून कसा दूर असेल ?

त्यामुळे एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर त्यासाठीही काही बाबींची पूर्वतयारी करण्याची आवश्यकता असते. जसे-

 • व्यवसाय सुरू करण्याचा मुख्य उद्देश.
 • उत्पादनाचे उत्पादन, उत्पादनाची विक्री किंवा सेवा क्षेत्र यापैकी व्यवसायाचे स्वरूप नक्की कोणते आहे, त्यावरून व्यवसायाचा आवाका ठरतो. त्यामुळे कोणता व्यवसाय करायचा आहे, (रिटेलर, होलसेलर, उत्पादक) याची स्पष्ट कल्पना असावी.
 • व्यवसाय कोठे करायचा आहे, ते ठिकाण व्यवसायासाठी योग्य आहे का ? व्यवसायासाठी लागणारी जागा ही भाड्याने असेल की स्वतःची असेल. भाड्याने असेल, तर त्यासाठीचा करार, भाडे आणि अनामत रक्कम यांचा पडताळा.
 • उत्पादित वा विक्री करीत असलेले उत्पादन वा पुरवल्या जाणा-या सेवेला बाजारपेठेत कितपत मागणी आहे, हे लक्षात घेण्याची गरज आहे.
 • व्यवसायासाठी आवश्यक कर्मचा-यांची संख्या किती असेल. त्यांच्या पगारापोटी दरमहा कितपत रक्कम अदा करावी लागेल.
 • ग्राहकांना आपल्यापर्यंत किंवा आपल्याला ग्राहकांपर्यंत कसे पोहोचता येईल.
 • व्यवसायात असलेली तुमची भूमिका.
 • व्यवसाय भागीदारीत असेल की स्वतंत्र. 
 • व्यवसायासाठी स्वतःचा पैसा कितपत वापरावा लागेल आणि कर्ज किती घ्यावे लागेल. त्यासाठी कोणत्या बँकेकडून कर्ज मिळेल. कर्ज मिळविण्याची प्रक्रिया.
 • व्यवसायासाठी सरकारच्या कोणत्या योजना आहेत का, त्याची माहिती.
 • व्यवसायातील प्रतिस्पर्ध्याबद्दल इत्थंभूत माहिती हवी. प्रतिस्पर्ध्याचे उत्पादन वा त्यांच्याकडून ग्राहकांना पुरवली जाणारी सेवा यामध्ये काय फरक असेल. 
 • तुमचा ग्राहकवर्ग कोणता असेल
 • तुमच्या व्यवसायाचे वेगळेपण असेल. ग्राहक प्रतिस्पर्धी सोडून तुमच्याकडे का आकर्षित होतील, याचीही कल्पना असायला हवी.
 • व्यवसायासाठी कच्च्या मालाचा पुरवठा कोण करेल
 • व्यवसायाची जाहिरात कोणत्या माध्यमातून करायची आहे.
 • व्यवसायासाठी आवश्यक त्या सर्व विम्यांची माहिती.
 • व्यवसायाच्या स्वरूपानुसार व्यवसाय आणि नावाची सरकार दरबारी नोंदणी
 • व्यवसायासाठी आवश्यक असलेले कौशल्य व पूर्ण माहिती.
 • कंपनीचा लोगो.

 

- सरिता सोनावणे.

3.81818
सरासरी 3.8 (11 votes)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation