Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

स्क्रीन प्रिंटींग (मुद्रण/छपाई) करणे

स्क्रीन प्रिंटींग
सौजन्य -blogbydonna.com

लग्नसमारंभ, निवडणुका, घरघुती कार्यक्रम, पुस्तके, व्हिजिटिंग कार्डस्‌ अशी अनेक कामे डोळ्यासमोर आली की आपल्याला आठवण येते ती स्क्रीन प्रिंटींग करणाऱ्या व्यक्तीची किंवा व्यवसायाची. वर्षाचे बारा महिने चालणारा हा व्यवसाय हमखास फायदेशीर आहे. कॉम्प्युटर आणि इंटरनेटच्या आधुनिक तंत्रज्ञानाची जोड ही स्क्रीन प्रिंटींग व्यवसायाला मिळाली आहे.

स्क्रीन प्रिंटींग हा एक महिन्याचा कोर्स आहे. त्यासोबत डी.टी.पी. आणि टायपिंगसारखे कोर्स केले, तर ते उपयोगाचे ठरतात.

आर्थिक गणित - 

उदाहरणार्थ,  आपल्याला १०  लेटर हेड बुकलेट तयार करण्याची ऑर्डर मिळाली.  उत्पादन खर्चाच्या    ४० %  नफा आपल्याला होतो. 

लेटर हेड बनविण्यासाठी येणारा उत्पादन खर्च :  

लेटर हेडसाठी (२ रंग)          रु.  ४००/–

१,००० प्रतींसाठी                 रु.  ६००/–

प्लास्टिक फ्रेम (पोलिटीव्ह)    रु.  ५०/-

डीझाईन                          रु.  २००/-  

बायडींग १० प्रतींचे               रु.  १००/-

---------------------------------------

 एकूण गुंतवणूक                रु. १,३५०/-

 

गुंतवणूक रु. १,३५०/- असल्यास  ४०% नफा रु. ५४०/- इतका होतो.  घरच्या घरी सुरु करता येण्यासारखा या व्यवसायाला परवान्याची (लायसन्स) आवश्यकता नाही.

एका महिन्यासाठी  उत्पादन खर्च हा रुपये २५,०००/- इतका येतो. त्यामध्ये रॅक्स, एक्सपोस टेबल, स्क्रीन, कलर्स, सुजी, क्रोमोनिल, फाईन कपडा, आदी व्यावसायिक वस्तूंचा समावेश होतो. खेळत्या भांडवलामध्ये रॉकेल, क्रोमोनिल,सुजी, कलर्स, फाईन कपडा यांचा रुपये  १५,०००/- इतका खर्च अपेक्षित आहे. स्क्रीन प्रिंटींग व्यवसायासाठी उत्पादन खर्च आणि खेळते भांडवल असे एकूण रुपये ४०,०००/- गुंतवणूक करावी लागते. ४०% फायदा हा हमखास स्क्रीन प्रिंटींग व्यवसायात आहे.  

स्क्रीन प्रिंटींगच्या ऑर्डर्स मिळवण्यासाठी आपल्याकडे विविध सँपल्स असणे आवश्यक आहे. अनेक आजुबाजूच्या लोकांना आपल्या व्यवसायाची माहिती झाल्यानंतर घरपोच ऑर्डर मिळू शकतात. बाजारातील घडामोडी आणि दैनंदिन होणारे तांत्रिक आणि आधुनिक बदल लक्षात घेऊन ते बदल आपल्या व्यवसायात करणे आवश्यक आहे. त्यामुळे व्यवसायातील आपल्या कामाची गुणवत्ता वाढते आणि त्याचा सकारात्मक परिणाम व्यवसायावर होतो. 

व्यवसाय वाढीसाठी वीस ते तीस प्रेस मालकांच्या गाठी-भेटही घ्याव्यात. त्यांच्याकडून कामाच्या ऑर्डर्स घेऊन त्या वेळेत पूर्ण करून द्याव्यात. जेणेकरून नंतरची ऑर्डर्स लवकर मिळेल. शासकीय कार्यालये, खाजगी लहान-मोठ्या कंपन्या, बँका, विविध क्षेत्रातल्या व्यक्ती, अधिकारी, व्यावसायिक, अधिकारी, उद्योजक आदींच्या व्हिजिटिंग कार्डसच्या ऑर्डर्स मिळवाव्यात. त्यासाठी सुरुवातीला काही आकर्षक, दर्जेदार आणि स्वस्त दरातील सँपल्स दाखवावेत. लग्नपत्रिका, वाढदिवस, वास्तुशांती, निवडणुका, आदी कार्यक्रम येतच असतात. 

स्क्रीन प्रिंटींग हा एक सेवा (सर्व्हिस) देणारा व्यवसाय आहे. जाहिरात आणि मार्केटिंग करून योग्य पाठपुरावा (फॉलोअप) केला. तर भरपूर कामे मिळतील. स्क्रीन प्रिंटींग व्यवसायात यशस्वी झालेले अनेक जण आपल्या आजुबाजूला आहेत. मग स्क्रीन प्रिंटींग व्यवसाय सुरु करताय ना ! 

 

- ऋषिकेश सावंत
   व्यावसायिक - एच.एम.एस. प्रिंटर

            

संकलन - विनित मासावकर
            vinit.masavkar@pif.org.in

 

3.863635
सरासरी 3.9 (22 votes)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation