Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

मुलाखतीचे शिष्टाचार

 इतरांच्या मनातली तुमची प्रतिमा ही फक्त तुमच्या बोलण्यावरून ठरत नसते. लहान सहन बाबतीतही तुम्ही पाळत असलेल्या किंवा पाळत नसलेल्या शिष्टाचारांवरून ती ठरत असते. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे शिष्टाचार पाळले जातात. मुलाखतीत आणि कामाच्या ठिकाणी कोणते शिष्टाचार पाळावेत याची थोडक्यात माहिती घेऊ. 

मुलाखतीच्या वेळी -

 • मुलाखतीची प्रक्रिया ही तुम्ही कंपनीच्या आवारात प्रवेश करताच सुरु झाली आहे असे समजावे. येथे प्रत्येकाशी सौजन्याने वागावे. तुम्हाला रिसेप्शन एरियात भेटलेली एखादी व्यक्तीच कदाचित तुमची मुलाखत घेईल. तुमचा नंबर येण्याची वाट पाहत असताना मासिके चालणे, फोनवर जास्त वेळ बोलत राहणे टाळा. यामुळे तुम्ही अधीर आहात आणि येथे बोर झाला आहात असा संदेश जातो. मुलाखतीच्या वेळी फोन लक्षकरून बंद करा किंवा साईलेंट मोडवर ठेवा. चुकून फोन चालू राहिल्यास व मधेच रिंग वाजल्यास लगेच फोन बंद करा आणि माफी मागा.
 • मुलाखती साठी रुममध्ये जाताच सर्व मुलाखत घेणाऱ्या व्यक्तींशी हस्तांदोलन करा.  हस्तांदोलन करतांना तुमचे नाव सांगा. ओठांवर स्मितहास्य ठेवा. तुम्ही आधी रूममध्ये असाल तर मुलाखत घेणारी व्यक्ती रुममध्ये येताच उभे राहा आणि हस्तांदोलनासाठी आपला हात पुढे करा. 
 • तुम्ही केबिनमध्ये जाण्याआधी मुलाखत घेणारे तेथे बसले असतील तर त्यांनी बस म्हटल्याशिवाय  वा बसण्याची परवानगी घेतल्याशिवाय बसू नका. त्याच वेळी ते जर उभे राहिले असतील तर ते बसण्याआधीही बसू नका. कुठल्याही चहापानाला नम्रतेने नकार द्या. तुमचे समान तुमच्या खुर्चीखाली ठेवा.
 • मुलाखतीला बसले असतांना आपले हात छातीवर फोल्ड करून बसू नका. पाय क्रोस करून बसू नका. ह्या गोष्टी तुम्ही घाबरत असल्याचे व तुम्हाला संरक्षणाची गरज असल्याचे दर्शवितात. त्या शारीरिक दुरावा निर्माण करतात व त्याचे रुपांतर मानसिक दुराव्यात होते. 
 • मुलाखत घेणारी व्यक्ती प्रश्न विचारात असतांना तिला मधेच अडवू नका.
 • प्रश्नाचे उत्तर देतांना १-२ सेकंद थांबा. विचारपूर्वक उत्तर द्या. यातून प्रश्नकर्त्याप्रती आदरही दिसून येतो. 
 • मुलाखत संपल्यावर रूममधील प्रत्येकाशी हस्तांदोलन करण्यास विसरू नका. त्यांनी दिलेल्या वेळेबद्दल त्यांचे आभार माना. 
 • मुलाखतीमध्ये उत्तर देण्याचा सराव करा. तुमचा आवाज स्पष्ट आणि स्थिर असावा. त्यात अनावश्यक चाधुतर नसावेत. तुमच्या वागण्या बोलण्यातून आत्मविश्वास झलाकावा. समोरच्या व्याक्तीप्रतीही आदर दिसून यावा. 
 • मुलाखतीसाठी गेले असतांना रूममधील कुठल्याही वस्तूला हात लावू नका. तुमचे संपूर्ण लक्ष मुलाखातीवरच केंद्रित करा. इकडे तिकडे लक्ष देऊ नका. शांत राहा. 

कामाच्या ठिकाणी पाळावयाचे शिष्टाचार -

 • नेहमी चांगले, नीटनेटके, इस्त्री केलेले कपडे घालून कामावर जा. 
 • आपले व्यक्तिमत्त्व आनंदी ठेवा. उगीच चिडचिड करून कामाच्या ठिकाणचे वातावरण दुषित करू नका. 
 • ऑफिसमध्ये, फोनवर बोलतांना हळू आवाजात आवश्यक ठेवाढेच बोला. या बाबतीतले शिष्टाचार शिकून घ्या. 
 • काम सोडून, कामाच्या वेळात सहकाऱ्यांशी गप्पा मारत बसू नका. 
 • आपले काम प्रामाणिकपणे आणि व्यवस्थित वेळेत पूर्ण करा. लक्षात ठेवा तुमचे कामच तुमची ओळख आहे. 
 • कोणाच्या माघारी त्याची टिंगल करणे , निंदा करणे इत्यादी प्रकार कटाक्षाने टाळा. यामुळे तुमचीच प्रतिमा डागाळेल. 

लहान-सहान बाबींमध्ये तुम्ही पाळत असलेले शिष्टाचार तुम्ही सभ्य आहात हे सिद्ध करतात. यामुळे लोकांचा तुमच्याप्रती आदर वाढतो. शिष्टाचार पालनात कधीही आलास करू नका. एखादी चूक तुमची नौकरी हिरावून घेऊ शकते आणि एखादा चांगला शिष्टाचार तुम्हाला नौकरी किंवा बढती मिळवून देऊ शकतो. म्हणूनच या बाबी नीट समजून घ्या आणि आपल्या आचरणात त्यांचा समावेश करा.

 

- परीक्षित सूर्यवंशी

 

3.375
सरासरी 3.4 (8 votes)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation