Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

टीमवर्क

टीमवर्क

टीम वर्कचा अर्थ
नोकरी करतांना किंवा कोणतेही काम करतांना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, प्रत्येक काम हे एकमेकांशी संबंधित आणि एकमेकांवर अवलंबून असते. त्यामुळे प्रत्येकाला एका ठराविक ग्रुप मध्ये राहूनच काम करावे लागते. त्यालाच टीम वर्क असे म्हणतात.

टीममध्ये काम करताना 

  • एकाच ग्रुप मध्ये वेगवेगळ्या स्वभावाची वेगवेगळी माणसं एकत्र येऊन काम करत असतात. त्यामुळे प्रत्येक वेळी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते त्या पुढील प्रमाणे,
  • समोरच्याचे बोलणेही शांतपणे ऐका.
  • समोरच्या वक्तीला विरोधच करायचा असेल तर तो सौम्य भाषेत किंवा मला असे वाटते अश्या शब्दांनी सुरुवात करून करावा.
  • टीम मधील कुठल्याही ऐका व्यक्तीला टार्गेट करून त्याच्याविषयी गॉसीप करणे टाळा.
  • आपल्या टीम मेंबर विषयी बाहेरच्या टीम मेंबर बरोबर जाऊन गॉसिप करणे टाळा
  • काम करतांना टीमला शक्य तेवढी मदत करा.
  • एकमेकांच्या गुणांचा आदर करा.

टीमवर्क म्हणजे जे काम असते ते सर्वांनी मिळून करायचे असते त्यामुळे वैयक्तिक मतभेदांना थारा न देता काम कसे चांगले होईल त्याकडे लक्ष देणे आवश्यक असते. एकच काम दहा जणांच्या वेगवेगळ्या कल्पनांमुळे वेगवेगळ्या प्रकारे होत असते त्यामुळे टीममध्ये कुठलेही काम करताना प्रत्येकाच्या मतांचा आदर करायला पाहिजे. टीममेंबर हे एका कुटंबाप्रमाणे एकत्र येऊन काम करत असतात. त्यामुळे टीम मधील प्रत्येकाच्या मतांचा विचार काम करत असतांना व्हावयास हवा. तरच टीमची एकसंधता टिकून राहील.

 

- अनघा पाटील

 

3.666665
सरासरी 3.7 (3 votes)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation