Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

ऑनलाईन खरेदी

ऑन लाईन खरेदी

ऑनलाइन खरेदीचा अर्थ
आजकाल इंटरनेट मुळे ऑन लाईन खरेदी करणे हा पर्याय ही मोठ्या प्रमाणावर प्रचलित होत आहे . ऑनलाईन खरेदी म्हणजे आपण कंपन्यांनी दिलेल्या वेब साईट वर जाऊन एखादे प्रोडक्ट पहायचे आणि जर तुम्हाला ते आवडले तर तुम्ही ते घराच्या घरी बसूनच ऑर्डर नोंदवून मागवू शकता, कंपन्या ही त्यांची घर पोच डिलीव्हरी देतात. हा एक प्रकार तसेच दुसरा प्रकार म्हणजे कंपन्या दूरचित्रवाणी किवा वर्तमानपत्राच्या माधमातून आपल्या उत्पादनाची जाहिरात करतात, त्या जाहिराती जेव्हा आपण दुकानात जाऊन वस्तू खरेदी करतो ,तेंव्हा त्या खरेदीची मजाही मध्ये बघूनही आपण कंपनीच्या वेब साईट वर जावून आपली ऑर्डर नोंदवू शकतो. या सुविधांचे काही फायदे आहेत आणि काही तोटे ते आपण पाहू या .

ऑन लाईन खरेदीचे फायदे 

 • ऑन लाईन खरेदीमुळे वेळेची बचत होते.
 • आपल्याला दुकानंपर्यंत जा ये करण्यासाठी जो पैसा लागतो त्याची बचत होते.
 • घरी बसून वेगवेगळ्या वस्तू आणि त्यांच्या जाहिराती बघायला मिळतात .

ऑन लाईन खरेदीचे तोटे

 • ऑन लाईन खरेदीमुळे वस्तूंची क्वालिटी प्रत्यक्ष पाहायला मिळत नाही .
 • वस्तुच्या किमती विषयी बार्गेनिंग करता येत नाही
 • किंवा फ्री वस्तूची मागणी करता येत नाही.
 • वस्तू जर खराब निघाली तर प्रत्यक्ष दुकानदाराशी जाऊन बोलणे शक्य नसते.
 • ऑन लाईन खरेदी चे हे काही फायदे व तोटे आहेत .

ऑन लाईन खरेदी करताना घ्यावयाची काळजी

 • ऑन लाईन खरेदी जरी सोपे असले तरी ते करताना कधी काही काळजी घेणे आवश्यक असते, ती पुढीलप्रमाणे:-
 • ओंन लाईन खरेदी करताना ती कोणत्या कंपनीची आहे ते बघूनच खरेदी करावी. खरेदी करताना कंपनीची विश्वासाहर्ता तपासून पहावी.
 • वस्तूच्या गॅरंटी , वॉरंटी तसेच क्वॉलिटीविषयी सविस्तर चौकशी करावी.
 • वस्तू जर खराब निघाली, तर तिच्या विषयी चौकशी कुठे करायची या विषयीची माहिती जाणून घ्या.

 

- अनघा पाटील

3.333335
सरासरी 3.3 (9 votes)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation