Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रातील करिअर

वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रातील करिअर
सौजन्य -news.xinhuanet.com

उद्योग क्षेत्र हे विस्तृत आहे. अशा ठिकाणी अनेक विभाग असून त्यांचा करियरच्या दृष्टीकोनातून  विचार व्हावा. वेगवेळ्या उद्योग क्षेत्रात करियरच्य अनेक संधी आहेत.

उद्योगजगतेचा विकास साधणे, हा सध्या एक जागतिक प्राधान्यक्रमाचा विषय आहे. त्यादृष्टीने वेगवेगळे उद्योग क्षेत्रातील करिअर संदर्भात व्यावसायिक वृत्ती अंगी बाणवणे अत्यंत महत्वाचे आहे. जागतिकीकरणामुळे जगातील राष्ट्रे एकमेकांजवळ आली असून माहिती – तंत्रज्ञानामध्ये प्रगती झाली आहे. याचा सकारात्मक परिणाम उद्योगविश्वावर झाला आहे. नवनवीन उद्योगक्षेत्रातील संधी शोडल्या पाहिजे. अनेक प्रकारचे अनेक उद्धोग आपण करू शकतो.  

बांधकाम व्यवसाय
भारतातील अनेक शहरात झपाट्याने नागरीकरण होत आहे. अनेक खेड्यापाड्यातून नागरिक रोजगारासाठी शहरात येत असतात. त्यांना राहण्यासाठी घरांची आवश्यकता असते. सध्या बांधकाम व्यवसाय तेजीत असून त्यातून चांगला आर्थिक फायदा होत आहे. 

कच्च्या मालाचे उत्पादन
मोठमोठ्या कंपन्यांना कच्चा माल पुरवणे. उदा. टाटा, बजाज, रिलायंस आदी  कंपन्या स्वत: सर्व कच्चा माल (पार्ट) बनवत नाही. तर त्या कंपन्या अनेक छोट्यामोठ्या कंपन्याकडून कच्चा माल घेतात. 

अॅनिमेशेन
अॅनिमेशेन पाहणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अॅनिमेशेन बनवण्यारांचे उद्योग चांगले सुरु आहे. अॅनिमेशेन म्हणजे केवळ कार्टून असा समज आता कालबाह्य झाला असून डबल रोल, निर्जीव वस्तूंना सजीव बनवणे, जाहिराती, कंन्स्ट्रकशन, ऑटोमोबाईल अशा हजारो क्षेत्रात अॅनिमेशेन पोचले आहे. 

संगणक दुरुस्ती
संगणक हार्डवेअरचे शिक्षण घेऊन  अनेक कंपन्या, संस्था, शाळा, दुकाने या ठिकाणी संगणकांचा वापर होत असून त्यांच्या देखभालीची दुरुस्तीची गरज निर्माण होत आहे. या ठिकाणी संगणक दुरुस्ती सेवा देऊन चांगल्या प्रकारे आपला उद्योग वाढवता येतो.

मोबाइल दुरुस्ती 
भारतीय बाजारपेठेत अनेक मोठमोठ्या कंपन्यांचे  मोबाइल दररोज सादर होत असतात. मोबाइल मधेही  छोटे-मोठे  बिघाड झाल्यवर त्यांची दुरुस्ती करणाऱ्याची संख्या फार कमी आहे. त्यामुळे मोबाइल दुरुस्ती ह्या उद्योगाला चांगले भविष्य आहे. 

गाडी दुरुस्ती
दुचाकी, चारचाकी गाड्यांची दुरुस्ती, सर्विस सेंटर उभे करणे. हा उद्योग चांगला आहे. उद्योग व्यवसाय करू इच्छिणाऱ्यासाठी असे अनेक प्रकारचे उद्योग उपलब्ध आहेत. 


तुम्हाला या व्यतिरिक्त अनेक व्यवसायांचे पर्याय उद्योग समूहात उपलब्ध आहेत. मग, तुम्ही कोणता पर्याय निवडणार  ! 
 

 

-अभिजीत कोळपे

 

3.6
सरासरी 3.6 (5 votes)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation