Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

नोकरीसाठी अर्ज कसा करावा

नोकरीसाठी अर्ज करणे, हे नोकरी संदर्भातील महत्वाचे पाऊल आहे.    जीवनात आपण अनेक प्रकारचे अर्जाचे नमुने पाहिलेले, लिहिलेले असतात. परंतु चांगली नोकरी मिळवण्यासाठी अर्ज करताना पुढील मुद्द्याची काळजी घेणे आपल्या अर्जामध्ये आवश्यक आहे.

प्रति
आपण नोकरीसाठी अर्ज कोणत्या संस्था, कंपनीत करत आहे. तेथील प्रमुख व्यक्तीचे नाव, पद, कंपनी हें अर्जाच्या डाव्या बाजूला सुरुवातीला असायला हवे. तसेच उजव्या कोपऱ्यामध्ये अर्ज करत असलेल्या दिवसाची दिनांक  लिहिणे आवश्यक आहे.

विषय
या मुद्द्यामध्ये प्रामुख्याने आपण कोणत्या पदाविषयी अर्ज करत आहोत, त्याविषयी माहिती द्यावी. उदा. व्यवस्थापक पदासाठी अर्ज..., उपसंपादक पदासाठी अर्ज... , इ. 

वरिष्ठाविषयी आदर
विषय या घटकानंतर आपण ज्या व्यक्तीला नोकरीसाठी अर्ज करत आहे, त्याविषयी आदरणीय महोदय, सप्रेम नमस्कार, असे आदरपूर्वक लिहावे.

स्वत:विषयी माहिती
यामध्ये आपले स्वत: चे पूर्ण नाव लिहावे. त्यानंतर आपण कोणत्या विषयात पदवी घेतली. ती कोणत्या विद्यापीठातून कोणत्या वर्षी घेतली आहे. याविषयी माहिती द्यावी. त्यानंतर सध्या आपण कोठे काम करत आहे, याविषयी माहिती द्यावी. तेथे केलेल्या कामाचा अनुभव याचा उल्लेख करावा. त्यानंतर आपली आवड / छंद याविषयी माहिती द्यावी. 

विनंती
आपल्याला नोकरीची गरज असल्याने शेवटी नोकरीच्या मागणीसाठी आदरपूर्वक विनंतीचा उल्लेख करावा. तसेच सोबत स्वत:ची व्यक्तिगत माहिती जोडत आहे, असा उल्लेख करावा. शेवटी डाव्या बाजूला कळावे, असा उल्लेख करावा.

स्वाक्षरी/सही
संपूर्ण अर्ज लिहून झाल्यानंतर अर्जाच्या शेवटी उजव्या बाजूला आपला आदरार्थी असे संबोधून  त्याखाली थोडी जागा सोडून आपली मराठीत अथवा इंग्रजीत स्वाक्षरी / सही करून त्याखाली पूर्ण नाव, दिनांक व ठिकाण लिहावे. 

 

-अभिजीत कोळपे

 

3.64407
सरासरी 3.6 (59 votes)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation