Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

या विभागात

व्यायाम

व्यायाम

निरामय आरोग्यासाठी आपल्या दिनचर्येत नियमाने व्यायाम करण्याची तरतूद असणे गरजेचे आहे. लवकर झोपावे व लवकर उठावे हे ओघाने आलेच ,पण पुरेशी झोप, स्वच्छता ,शांतता ,चालणे, सूर्य नमस्कार व उत्तम आहार या सहा गोष्टीवर लक्ष देणे गरजेचे आहे.

शास्त्रशुद्ध व्यायाम हा चार प्रकारे केला जातो

  •  स्थिर पद्धतीचा
  •  चल पद्धतीचा
  •  तोल सांभाळण्याचा
  •  दीर्घकालीन श्रम करतांना दमछाक होऊ नये म्हणून करण्याचा व्यायाम या सर्व प्रकारांची माहिती करून घ्यावी व आपल्या शरीराला कोणत्या प्रकारची कमी-जास्त गरज आहे,  त्यानुसार कौटुंबिक  डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार व्यायाम करावा.

सर्व वयात करता येण्यासारखा व्यायाम म्हणजे पायी चालणे .नियमाने संथ गतीने सपाटीवर ४० ते ४५ मिनिटे ठरलेल्या वेळी चालणे हे उत्तम. फार भरभर चालण्याने सांधे दुखणे, स्नायू थकणे किंवा हृदयावर ताण येऊ शकतो तेव्हा चालताना काळजी जरूर घ्यावी .सूर्यनमस्कार हा देखील एक सर्वांग सुंदर असा व्यायाम आहे, सूर्यनमस्कारात स्थितीचा क्रम व कुठलेही साधन न वापरता करता येण्याजोगा व्यायाम आहे. सूर्यनमस्कारात प्रत्येक स्थितीत किमान ६ सेकंद थांबावे , शक्यतो सूर्यनमस्कार हे सकाळी करणे लाभदायक असते. व्यायाम करतांना सुरवातीला संथ हालचाली(वार्मिंग अप ) आणि व्यायामाची  पुन्हा संथ हालचालीने व्हावी. व्यायामात श्वासोच्छवासाचे नियंत्रण फार महत्त्वाचे आहे.

 

- वैशाली जोशी

3.46154
सरासरी 3.5 (13 votes)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation