Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

गरोदरपणातील रातांधळेपणा

अनेक गरोदर स्त्रियांना रात्री अंधारात दिसत नाही. जेवणात ‘अ’ जीवनसत्व नसले कि असे होते. यावर उपचार केले नाहीत तर बाळालाही ‘अ’ जीवनसत्व कमी पडते. पूर्वी म्हणत कि काही मुलेच अशी असतात कि ज्यामुळे आईला रात्री दिसात नाही परंतु हा गैरसमज आहे. 

या गैरसमजामुळे बऱ्याच स्त्रिया या त्रासाबद्दल बोलत नाहीत व औषध घेत नाहीत. हिरव्या पालेभाज्या, पिवळी फळे,  पालेभाज्या, गाजर, टोमाटो, दुध, अंडी, मांस यात ‘अ’ जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते म्हणून हे पदार्थ गरोदर बाईने नियमित खावेत. कमी ताकदीच्या म्हणजे ८ हजार युनिट ‘अ’ जीवनसत्वाच्या गोळ्या खाल्ल्यास रातआंधळेपणा लगेच बरा होतो. 

 

- श्वेता मराठे

2.727275
सरासरी 2.7 (11 votes)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation