Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

या विभागात

प्रथमोपचार कसे करावेत ?

प्रथमोपचार

कोणतीही वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसताना केले जाणारे उपचार म्हणजे ‘प्रथमोपचार’ होय. खेळताना खरचटणे, जखम होणे, अपघात होणे, मुका मार लागणे हे सर्व अनवधानाने होते. अशा वेळी काय करावे ? हे अपघातग्रस्त व्यक्तीला कळत नाही. सोबत असणारे लोक यांना देखील कल्पना नसते.  म्हणून ती व्यक्ती गोंधळते आणि साधी जखम किंवा अपघातसुद्धा मोठे स्वरूप धारण करण्याची शक्यता असते. म्हणून प्राथमिक उपचार करणे, हे महत्वाचे ठरते.

एखादा मुलगा खेळताना पडून जखमी झाला. अशा वेळेला काय कराल ? रक्तस्त्राव कमी असेल तर हळद लावावी. रक्तस्त्राव जास्त होत असल्यास रुमाल थोड्याफार प्रमाणत घट्ट बांधावा, जेणेकरून रक्तस्त्राव कमी होईल. नंतर ती जखम पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी. नेस्पोरीन किंवा सोफ्रोमायसीन मलम लावून बँडेज करावे. जे कामगार अंगमेहनतीची कामेकरतात किंवा ज्यांना काम करताना जखम होण्याची शक्यता जास्त असते. त्यांनी धनुर्वाताचे इंजेक्शन  (अँटीटॅनस व्हॅकसिन) दर सहा महिन्यांनी घ्यावे. मुका मार लागल्यास ज्या शारीरिक भागावर मार लागला आहे अशा ठिकाणी थोडा वेळ मॉलिश करावे आणि नंतर डॉक्टरांकडे जावे. 

समजा, एखादी व्यक्ती बुडताना आपल्याला दिसली तर त्याला प्रथम वाचवणे आणि किनाऱ्यावर आणणे. त्याला सरळ झोपवावे. त्याची नाडी तपासावी आणि जीभ सरळ करावी. छातीवर म्हणजेच फुफ्फुसावर दाब द्यावा. या क्रिया करत असताना रुग्णवाहीकेला (अँम्ब्युलंस) दूरध्वनी (फोन) करून घटनास्थळी बोलवावे. त्या व्यक्तीचा श्वासोच्छ्वास सुरळीत आहे की नाही तो तपासावा. श्वासोच्छ्वास सुरळीत नसल्यास मुखावाटे कृत्रिम श्वासोच्छ्वास (माउथ टू माउथ रेस्पिरेशन) द्यावा. जेणेकरून रुग्णवाहीका येईपर्यंत व्यक्तीला प्राथमिक स्थरावर उपचार मिळावेत. 

अशा प्रकारे प्राथमिक उपचार दिले, तर अपघातग्रस्त व्यक्तीला तत्काळ उपचार मिळतील. तसेच व्यक्तीला झालेल्या अपघाताची तीव्रता कमी होण्यास मदत मिळते. प्रथमोपचार केल्याने डॉक्टरांना वैद्यकीय उपचार करताना सोयीचे जाते आणि व्यक्तीला आराम मिळतो. म्हणून प्रथमोपचार करणे महत्वाचे आहे आणि ते कसे करावेत याची देखील माहिती असणे आवश्यक आहे.                   

 

मुलाखत – डॉ. कुणाल वेसावकर (B.A.M.S.) 
              बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसीन अँन्ड सर्जरी 

 

- विनित मासावकर    

 

3.5
सरासरी 3.5 (2 votes)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation