Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

मुलांची सामान्य वाढ

मुलांची सामान्य वाढ
सौजन्य -www.theguardian.com

मुलांची सामान्य वाढ म्हणजे विशिष्ट वयामध्ये ठराविक वजन असल्यास त्याला ‘सामान्य वाढ’ म्हटले जाते. वयोमानानूसार उंची आणि वजन यांचे परिमाण हे सर्वसाधारणपणे मानले जाते. कमीत कमी आणि जास्तीत जास्त (कमाल आणि किमान) असे प्रमाण सामान्य वाढीसंदर्भात ठरवले जाते.

वाढ आणि विकास ही सतत चालणारी आणि क्रमाने होणारी प्रक्रिया आहे. शरीरातले पेशी या वाढतात आणि नंतर काही कालावधीने मरतात. एकच पेशी संपूर्णपणे जिवंत राहत नाही. वाढ आहे ती डोक्यापासून ते पायापर्यंत क्रमाने होत असते. गर्भावस्थेमध्ये सर्वप्रथम डोके बनते आणि हळू हळू संपूर्ण शरीर बनते. विकासासंदर्भात लहान मुल पहिल्यांदा स्वत:ची मान पकडते, नंतर हाताच्या हालचाली सुरु करते. काही महिन्यांनी तो बसतो आणि मग उभे राहण्यास शिकतो. मुले कुणाच्याही आधाराशिवाय तो उभे राहतो आणि नंतर चालण्यास शिकतो. अशाप्रकारे स्नायूंची वाढ ही क्रमाक्रमाने होत असते.

मेंदूचा विकास हा गर्भावस्थेमध्ये शेवटचे तीन महिने ते दोन वर्षात होतो. नंतर मेंदूचा विकास हळू होतो आणि एका टप्प्यावर तो विकास थांबतो.

पालक सांगतात की, ‘मुलाची वाढ होत नाही.’ मुलांची वाढ ही तीन टप्प्यांमध्ये होते. पहिल्यांदा गर्भावस्थेमध्ये पहिल्या काही महिन्यात वाढ होते. दुसऱ्यांदा जन्मानंतर पहिल्या वर्षात मुलाची वाढ होते. उदा . तीन किलोचे मुल पहिले वर्ष संपेपर्यंत नऊ किलोपर्यंत वाढलेले असते. तिसऱ्यांदा किशोरवयात मुलाचे वजन आणि उंची योग्य प्रकारे वाढलेली आपल्याला दिसते. प्रत्येक मुलाची स्वत:ची वाढ होण्याची वेगळी पद्धत असते. त्यामुळे कुठल्याही मुलाशी स्वत:च्या मुलाची तुलना करू नये.  म्हणून मुलाच्या जन्मादरम्यान आणि जन्मानंतर काळजी घेणे आवश्यक आहे.     

 

- डॉ. हेतल नागडा
  आयुर्वेदिक चाईल्ड स्पेशालिस्ट
  B.A.M.S.,MD Ayu.(Balrog)


शब्दांकन – विनित मासावकर
               vinit.masavkar@pif.org.in 

 
0
No votes yet
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation