Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

या विभागात

आजार व उपचार

आजार व उपचार

ऋतुमानानुसार किंवा शारीरिक बदलामुळे जे लहान आजार होतात त्यां सर्वसाधारण आजार असे संबोधले जाते. सर्दी,ताप, खोकला, पित्त दोष, इत्यादी आजारांचा यामध्ये समावेश होतो.एखादा वैद्यकीय मुद्दा उपस्थित झाला की काही माणसे घाबरतात. पण जर तुम्ही समस्या समजून घेतली, तर मग तो मधमाशिचा दंश असो किंवा हाड मोडणे असो, त्याला सामोरे जाणे सोपे जाते.

तुमच्या कुटुंबाच्या वैद्यकीय पार्श्वभूमीची माहिती तुम्हाला भविष्यातील घातक रोगांपासून वाचवू शकेल. काही रोग कुटुंबात एका पिढीतून दुस-या पिढीत संक्रमित होतात. शहरात राहणा-या मुलांना दम्याचा धोका जास्त असतो. तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना वरचेवर श्वसनाचा त्रास होतो का? दम्यासारख्या आयुष्यास घातक रोगावर उपचार करण्यासाठी त्याची लक्षणं माहिती असणे आवश्यक आहे. 

एखाद्या तातडीच्या गंभीर परिस्थितीला सामोरे जाण्यास तुम्ही तयार आहात का? तुमच्या मुलाचा पाय एका गंजलेल्या खिळ्यावर पडला किंवा तुमच्या पायाला कुत्रा चावला तर काय केले पाहिजे याची पूर्व कल्पना तुम्हाला असावी.तुम्हाला एचआयव्ही / एडस चा धोका आहे का? तुम्हाला धोका आहे की नाही आणि त्यासाठी तुम्ही काय करू शकता याबद्दल अधिक माहिती मिळवा.

मानवाची रोगप्रतिकार शक्ती कमी झाली तर त्याला जंतुसंसर्ग होऊन व्याधींची लागण होण्यास सुरुवात होते. व्याधींचे वर्गीकरण विविध प्रकारे करता येते.

‘आनुवंशिक व्याधी’ या पुढील पिढीत संक्रमित होतात. गर्भवती स्त्रीने आहार आचरणात काळजी न घेतल्याने अपंग,आंधळा, बधिरता, मूकता अशा दोषांची शक्यता असते. चुकीच्या आहार सेवनाने ताप, जुलाब, सर्दी, खोकला, आदी व्याधी जडतात. अति व्यायाम, अति श्रम, अपघात, प्राणी दंशाने सुद्धा व्याधी निर्माण होतात. हवामान बदलामुळे किंवा ऋतूतील बिघाडामुळे अनेक रोग होतात. निसर्ग नियमानुसार जे बदल शरीरात होतात. उदा. वृद्धावस्था, मृत्यू किंवा नैसर्गिक संवेदना – तहान, भूक, झोप यांकडे दुर्लक्ष केल्याने अनेक व्याधींची समस्या गंभीर रूप धारण करते.

‘उपचारापेक्षा प्रतिबंध महत्त्वाचा असतो.’ आहार सेवनाच्या नियमित सेवन, शरीराची व्यवस्थित काळजी, हवामान बदलानुसार आणि प्रकृतीनुरूप आहारात बदल केले पाहिजे. व्याधी न होण्यासाठी आगोदरच प्रतिबंध केला, तर वैद्यकीय उपचाराची गरजच भासणार नाही.

 

 

- विनित मासावकर

 

2.666665
सरासरी 2.7 (3 votes)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation