Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

नवजात बालकांची काळजी

नवजात बालक

मुल जेव्हा गर्भात असते, तेव्हा ते पूर्णतः आईवर अवलंबून असते. परंतू जेव्हा नवजात बालकाचा जन्म होतो, तेव्हा त्याला बाहेरील वातावरणाशी जुळवून घेणे, आवश्यक असते. अशा वेळी त्याला श्वास घेणे, पोषणमुल्यांची उपलब्धता, समतोल हवामान याचा ताळमेळ बसणे गरजेचे असते. 

नवजात बालकांच्या आहारात आईचे दुध मिळणे, हे परिपूर्ण अन्न समजले जाते. बालकाचा जन्म झाल्यानंतर लगेच दोन तासात आईचे दुध देण्यास सुरुवात केली जाते. पहिल्या सहा महिन्यांत बालकाला आईचे दुधच मिळणे अत्यावश्यक आहे. कारण हे दुध पूर्णपणे बालकाची आवश्यक गरज भागवते. पहिल्या तीन दिवसांमध्ये आईच्या दुधातून वरचे वर जाड स्वरुपाचा थर येतो. काही मातांना वाटते कि हे दुध देणे गरजेचे नाही, परंतु हे दुध देणे आवश्यक असते. त्यामध्ये अ,ब,क,के जीवनसत्त्व आणि अँटी बॉडीज असतात, जे बालकाच्या पोषणाला कारणीभूत असते. 

आईचे बालकाला दुध देण्याचे फायदे असे आहेत कि, युटोराईन इनवोलव्हेशन हे स्त्रियांमध्ये जन्मानंतर जो रक्तस्त्राव होतो, तो कमी करण्यास मदत करते. यामध्ये लॅक्टेशनल अमोनेरीया असते, जे नैसर्गिकरीत्या मदत करते. सर्वात महत्वाचा फायदा हा कि स्त्रियांना भविष्यात होणारा ब्रेस्ट कॅन्सर आणि ओवरीयन कॅन्सर यांपासून प्रतिबंध करतो. डीमांड फीडिंग आणि टाईम फीडिंग मुलांना दुध पाजण्याच्या पद्धती आहेत. मुलाला जाणीव झाली कि त्याला दुध देण्यात येते. जर बाळ झोपले असेल, तर त्याला उठवून २ ते ३ तासांनी दुध द्यावे. बाळाला बसवून दुध दिल्यास उत्तम. बालकाच्या वैयक्तिक गरजेनुसार दुधाचे प्रमाण ठरते. कुठल्या बालकाला १५ मिनिटे तर कुणाला अर्धा तास आईचे दुध द्यावे लागते.

आईचे दुध योग्यप्रकारे बाळापर्यंत पोहचले आहे कि नाही हे कसे समजेल ? कारण बालकाला दुध व्यवस्थित मिळाले कि नाही किंवा बालकाला दुध हे कमी प्रमाणात दिले जात आहे, याबाबत आईला काळजी वाटते. याबाबत बालकाचे वजन तपासावे. जर बालकाचे वजन १० ग्रॅम ते २० ग्रॅम वाढल्यास मुलाला योग्यप्रकारे दुधाचा पुरवठा होत आहे, असे समजावे. दिवसातून ५ ते ६ वेळेस बालकाने लघवी पूर्ण केल्यास म्हणजे डायपर पूर्णपणे ओला झाल्यास समजावे दुध पुरेशा प्रमाणात बालकाला मिळत आहे.

जेव्हा आई बालकाला दुध पाजत असते, तेव्हा आईचा आहार हा समतोल असावा, मातेच्या आहारात कॅल्शियम आणि आयर्न असणे महत्त्वाचे आहे. अशाप्रकारे आईने स्वत:सोबतच बालकाजी काळजी घेणे आवश्यक आहे.    

 

– डॉ. हेतल नागडा
    आयुर्वेदिक चाईल्ड स्पेशालिस्ट
    B.A.M.S.,MD Ayu.(Balrog)
             

 

संकलन – विनित मासावकर
             vinit.masavkar@pif.org.in

  

 

3
सरासरी 3 (2 votes)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation