Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

सामाजिककरण आणि नेटवर्किंग(सुसंवाद)

सामाजिकीकरण

 

“नेटवर्किंग” म्हणजे एक आकर्षक शब्द आहे जो नोकरी मिळवण्यासाठी आपण परिचयाच्या लोकांकडे बोलतो. स्वतःचे असे एक नेटवर्क असतेच; गरज असते ती फक्त त्यात कोण आहेत हे बघण्याची आणि त्यांचा संदर्भ मिळवण्याची. उत्तम नेटवर्क तयार करण्यासाठी काही टिप्स, त्यासाठी काही स्टेप्स (पाया-या) आहेत:

पायरी एक (नेटवर्कची यादी तयार करण्याची)
तुमच्या प्रत्येक मित्राची, कुटुंबातील व्यक्तींची किंवा नोकरीसाठी मदत करू शकतील अशा प्रत्येक व्यक्तीची नवे, फोन क्रमांक व राहण्याचा पत्ता (असल्यास) लिहा.

पायरी दोन (महत्त्वाच्या व्यक्तींची निवड करा)
या यादीत अशा व्यक्तींची नावे लिहा जे तुम्हाला नोकरीसाठी मदत करू शकतील. उदाहरणार्थ, असा एखादा व्यक्ती जो तुम्हाला तुमच्या आवडत्या क्षेत्रात नोकरी करत असेल किंवा असा एखादा मित्र किंवा मैत्रीण जे ब-याच लोकांना ओळखत असतील.

पायरी तीन (नेटवर्कमधील व्यक्तींना फोन करण्यास सुरु करा)
जेव्हा तुम्ही फोनवर बोलता त्यावेळी अशा प्रकारे बोलावे: हॅलो, प्रिया मी निशा बोलतेय, पार्कातील मैत्रीण. मी आत्ताच माझा कॉम्प्यूटर कोर्स पूर्ण केला आहे आणि आता मी नोकरी शोधतेय. मला माहित होते की तू पण याच क्षेत्रात काम करतेस तर नोकरी मिळविण्यासाठी मला काही मदत करू शकशील?”

टीप: तुमचे कौशल्य व अनुभवाबद्दल सविस्तर बोला. जर तुमच्या नेटवर्कमधील लोकांना हे माहीतच नसेल की तुम्ही काय केलं आणि काय करण्याची तुमची इच्छा किंवा तयारी आहे तर तुम्हाला मदत करणे त्यांना कठीण होईल.

पायरी चार (तुमच्याकडे दुसरे नाव मिळेपर्यंत फोन ठेऊ नका)
जर त्या व्यक्ती तुमच्या नोकरीसाठी तुम्हाला मदत करू शकत नसतील तर ते अशा काही लोकांना ओळखत असतील जे तुम्हाला मदत करू शकतील. त्यांच्या ओळखीत जर तुम्ही कोणाला फोन करणार असाल तर तुम्ही अशा प्रकारे बोलावे:

“हॅलो, मिस्टर बागवे? राजेश कदम यांनी मला तुमचे नाव सुचवले होते. आम्ही एकाच ठिकाणी राहतो. मी कदम यांना माझ्या नोकरीसाठी बोललो होतो. मला कम्पुटर क्षेत्रामध्ये नोकरी हवी आहे तर कदम म्हणाले की तुमच्या या क्षेत्रात ओळखी आहेत व तुम्ही मला मार्गदर्शन करू शकाल.”

पायरी पाच (नंतर तुमचा बायो डेटा (स्वपरिचय पत्र) पाठवा)
तुमच्या बायो डेटाच्या प्रति काढा व तुमच्या नेटवर्कमधील व त्यांनी दिलेल्या ओळखीतील व्यक्तींना त्या पाठवा. त्यासोबत एखादा आभाराचे पत्र ही जोडा ज्यात तुम्ही त्याना मदत करण्याबद्दल आणि पुन्हा एकदा तुमच्या विषयी माहिती व आवड कळवू शकता. जर तुमच्याकडे बायो डेटा नसेल, तर तो तयार करण्यासाठी अनेक साईटस आहेत त्यांचा उपयोग करा.

जर या काही पाय-यानुसार नोकरी शोधली तर तुम्हालाही कळणार नाही की तुमचे नेटवर्क कशा प्रकारे वाढेल. 

 

0
No votes yet
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation