Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

राष्ट्रीय नाट्य विद्यालय

राष्ट्रीय नाट्य विद्यालय ही एक  नाट्य शिक्षण देणारी संस्था असून ती दिल्ली मध्ये प्रस्थापित आहे.१९५९ साली संगीत नाटक अकादमीच्या वतीने  या संस्थेची  स्थापना करण्यात आली.  १९७५ साली ही स्वतंत्र  स्वायत्त संस्था बनली. या संस्थेला संपूर्णपणे  भारत  सरकारच्या  सांस्कृतिक विभागाकडून वित्तापुरवठा केला जातो.  नाट्य शिक्षण देणारी ही देशातील अग्रगण्य संस्था आहे.   या संस्थेत संस्कृत, आधुनिक भारतीय, पारंपरिक, आशियायी तसेच पाश्चिमात्य  नाटकांचे शिक्षण दिले जाते. यामध्ये  नाट्य, संगीत, आवाज, त्यातील चढउतार, निर्मिती  कौशल्य, कला या सर्व गोष्टी  या अभ्यासक्रमात शिकवल्या जातात.  पहिल्या वर्षी प्राथमिक स्तरावर सर्व विषयांची ओळख करून दिली जाते. नंतर  आपण निवडलेल्या विषयासंबंधीचे सखोल ज्ञान दिले जाते. ही संस्था नाट्य शिक्षणासाठी सर्व सोयीसुविधा पुरवते.

या संस्थेतर्फे तीन वर्षाचा पूर्णवेळ पदविका अभ्यासक्रम चालवला जातो. इथे प्रवेश  घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीने कोणत्याही  शाखेची पदवी घेतलेली असणे आवश्यक आहे. त्या व्यक्तीला स्वतःच्या मातृभाषेबरोबरच हिंदी व इंग्रजीचे  ज्ञान असणे आवश्यक आहे. त्या  व्यक्तीने किमान सहा वेळा नाटकात  काम करणे आवश्यक आहे. दरवर्षी  याची  प्रवेशप्रक्रिया होते. फॉर्म भरल्यानंतर  काही दिवसांतच  याची प्रवेशप्रक्रिया घेतली जाते.  उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दिल्लीला  बोलावले जाते.  त्यानंतर चार ते पांच दिवस कार्यशाळा  घेऊन त्यातून अंतिम विद्यार्थ्यांची  निवड केली जाते. यात मागासवर्गीयांसाठी काही जागा राखीव  ठेवण्यात येतात. यासाठी प्रवेश शुल्क  नाममात्र ठेवण्यात आले आहे. याशिवाय संस्थेतर्फे प्रत्येक विद्यार्थ्याला  इथे निवड दरमहा सहा हजार रुपये स्कॉलरशिप देण्यात येते. इथे निवड झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला हॉस्टेलवर राहणे बंधनकारक  आहे. या अभ्यासक्रमाची  वेंळ सकाळी  सहा ते संध्याकाळी  आठ अशी आहे.  

- श्रद्धा कोळेकर

3
सरासरी 3 (4 votes)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation