Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

कर्जाची आवश्यकता आहे का ?

 कर्जाची आवश्यकता
सौजन्य -dineshpratap06.blogspot.com

दैनंदिन जीवनात भेडसावत असलेली महागाई, अन्न, वस्त्र, निवारा यापैकी अत्यंत महत्त्वाचा बनलेला निवा-याचा प्रश्न, अत्यावश्यक किंवा इच्छा - आकांक्षांची पूर्तता, लग्नकार्यासारखे समारंभ आदींची पूर्तता करण्यासाठी पैसा हा महत्त्वाचा घटक आहे. मात्र, त्यांची पूर्तता करण्यासाठी पैसा उपलब्ध असेलच असे नाही. त्यामुळे सर्वसामान्य, मध्यमवर्गीयांसाठी या बाबींची पूर्तता करण्यासाठी कर्ज हा एक पर्याय ठरला आहे. त्यामुळे आवाक्याबाहेर असलेल्या किमती कर्जाच्या सहाय्याने आवाक्यात येत आहेत.

एखाद्या बाबीची पूर्तता करण्यासाठी बँक किंवा वित्तिय संस्थांकडून ठराविक व्याजदराने ठराविक कालावधीसाठी घेतलेली रक्कम म्हणजे त्या संस्थेकडून आपण घेतलेले कर्ज होय. 

सध्या विविध प्रकारचे कर्ज देणा-या वित्तिय संस्था उपलब्ध आहेत. ग्राहकांना कर्जाची असलेली गरज ओळखून आकर्षक योजनांद्वारे ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अशा वित्तिय संस्थांमध्ये एक प्रकारची स्पर्धाच सुरू आहे. त्यामुळे ग्राहकांना कर्ज मिळविण्यासाठी पूर्वीसारखी धावाधाव करण्याची परिस्थिती राहिली नाही. मात्र, सहजासहजी उपलब्ध होत असलेल्या कर्जाची परतफेड तितक्याच सहजपणे करता येईलच असे नाही. त्यामुळे लहानपणापासून ऐकत आलेल्या ‘अंथरूण पाहून पाय पसरावे,’ या म्हणीचा प्रत्यक्ष आयुष्यात विचार करण्याची गरज आहे.

बाजारात अनेक योजना उपलब्ध असल्याने, त्यातच तंत्रज्ञानाचे युग असल्याने अनेक वस्तू वा योजनांची भुरळ पडणे साहजिक आहे. मात्र, कर्ज घेताना गरजा आणि इच्छा आकांक्षा यांची सांगड घालण्याची गरज आहे. त्यामुळे कर्ज घेताना आपल्याला खरंच कर्ज घेण्याची आवश्यकता आहे का, याचा विचार करावा लागेल. त्यासाठी स्वत:ला पुढील प्रश्न विचारून पाहा.

  • आपण ज्या कारणासाठी कर्ज घेत आहोत, ते कारण अत्यावश्यक गरजेत मोडते की चैन, इच्छा, आकांक्षा या प्रकारात मोडते?
  • कर्ज घेणे अटळ आहे का?
  • आपल्याकडे जमा असलेल्या पैशातून आवश्यक ती गरज पूर्ण होणे शक्य नाही का?
  • कर्ज घेऊन केल्या जाणा-या खरेदीचे गुंतवणुकीत रूपांतर होणार आहे का? ती गुंतवणूक भविष्यात मोबदला मिळवून देणारी आहे का? 
  • आपण गरज किंवा अत्यावश्यक नसतानाही केवळ ‘खोट्या’ प्रतिष्ठेपोटी कर्ज घेत नाही ना?
  • महत्त्वाचे म्हणजे घेतलेले कर्ज फेडण्याची आपली आर्थिक क्षमता आहे का ? 


- कत्यप्पा कांबळे

 

2.666665
सरासरी 2.7 (3 votes)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation