Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी

कर्ज घेण्याच्या निर्णयानंतर प्रत्यक्ष कर्ज मिळविण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केल्यानंतर कोणत्या प्रकारचे कर्ज घेणार आहोत, त्यानुसार आपल्याला कमी-अधिक प्रमाणांत भेडसावणाऱ्या अडचणींना सामोरे जावे लागते. त्यातही वैयक्तिक कर्ज, वाहन कर्ज यापेक्षा गृहकर्जाची रक्कम मोठी असल्याने वित्तीय संस्था कर्ज देताना अनेक कागदपत्रांची मागणी करीत असते. त्याची पूर्तता करण्यासाठी आपली अर्जाची फाइल वित्तिय संस्थेकडे, बँकेकडे सादर करण्यापूर्वी काही बाबी लक्षात ठेवण्याची गरज आहे. जेणेकरून कर्ज मिळण्यासाठी विलंब होणार नाही आणि अडचण उद्भवणार नाही.

  • कर्ज प्रकरणाची फाइल संबंधित बँक वा वित्तीय संस्थेकडे सादर केल्यानंतर आपले काम झाले, असे समजून चालत नाही. हा अर्ज पहिल्या टप्प्यात असताना आपले वय, उत्पन्न बँकेच्या निकषात बसत नसेल, तर बँक आपला अर्ज फेटाळू शकते. त्यामुळे अर्ज फेटाळू नये, यासाठी बँकेचे निकष आधी जाणून घ्या व पडताळणीपूर्वी त्याची पूर्तता करा.
  • जितक्या रकमेच्या कर्जासाठी अर्ज केला आहे, तितकी पूर्ण रक्कम कर्ज म्हणून मिळेलच याची शाश्वती नाही. तुमचे वार्षिक उत्पन्न, नोकरीची वर्षे (झालेली व राहिलेली), बँक स्टेटमेंटमधील नियमितता आदी बाबींची पडताळणी करून बँक कर्जाची रक्कम मंजूर करते. 
  • ठराविक रकमेचे कर्ज मिळण्यासाठी आवश्यक उत्पन्नाच्या निकषात बसत नसाल, तर पती-पत्नी, वडिलांचे उत्पन्न असल्यास त्यांना कर्ज प्रकरणात सह अर्जदार करून कर्जाची रक्कम वाढवून घेता येईल.
  • गृह कर्ज घेत असाल, तर त्यासाठी अपेक्षित रकमेपैकी १० ते २० टक्के रक्कम तुम्हाला डाउन पेमेंट म्हणून भरावी लागते. ही रक्कम न भरल्यास बँक तुमचा अर्ज फेटाळू शकते. काही बँका तुमच्या प्रॉव्हिडंट फंडची रक्कम किंवा इन्शुरन्स पॉलिसी डाउन पेमेंट म्हणून ग्राह्य धरतात, पण त्याची आधी खात्री करून घ्या.
  • गृह कर्जासाठी तुम्ही सादर केलेल्या अर्जाबरोबर बँकेच्या नावे प्रोसेसिंग फी म्हणून काही रकमेचा धनादेश(चेक) द्यावा लागतो. (ही रक्कम एकूण कर्जाच्या दोन टक्क्यांपर्यंत असू शकते). मात्र, कोणत्याही कारणास्तव तुमचा अर्ज बँकेने फेटाळल्यास कदाचित तुम्ही दिलेली प्रोसेसिंग फी परत द्यायची की नाही हे पूर्णता बँकेवर अवलंबून राहिल.
  • अशा अडचणी भेडसावू नयेत, यासाठी कागदपत्रांची योग्य जुळवाजुळव आणि बँकेने ठरवून दिलेल्या वेळेत संपूर्ण प्रक्रिया पार पाडणेच सोयीस्कर ठरेल. 

 

 

- कत्यप्पा कांबळे

 
3.5
सरासरी 3.5 (2 votes)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation