Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

लेखापरीक्षण

लेखापरीक्षण
सौजन्य -www.udemy.com

एखाद्या संस्थेची कार्यप्रणाली सभांचे इतिवृत्त, आर्थिक व्यवहारांचे ताळेबंद पत्रक, दस्तऐवज, कागदपत्रे, संस्थांची ध्येय, इ. संस्थेच्या नियमांनूसार सुरु आहे, याच्या मूल्यमापनाची पडताळणी म्हणजे ‘लेखापरीक्षण’(ऑडिट) होय. 

इजिप्तमधील प्राचीन संस्कृतीत लेखा पुस्तके लिहिण्याची पद्धत आढळून येते. व्यवहार लिहिणारे सुरुवातील लिहिलेले हिशोब लेखापरीक्षकास वाचून दाखवत असे आणि ते ऐकून हिशोब तपासण्याचे काम चालत असे. त्यामुळे इंग्रजीत लेखापरीक्षकास ‘ऑडिटर’ (Auditor) हा शब्द वापरण्यात आला. या शब्दाचा लॅटिनमध्ये ऑडियर (Audire) असे संबोधले जाते. लॅटिनमध्ये ‘ऑडियर’ (Audire) म्हणजे ‘ऐकणे’  होय.    

प्राचीन  काळापासून पारंपारिक पद्धतीने लेखापरीक्षण होत असल्याचे आढळते. बदलत्या काळानुसार लेखापरीक्षणाची पद्धत वेगवेगळ्या सुधारणा होऊन बदलत गेली, ते विविध संशोधनातून दिसून येते. 

भारतात १९१३च्या कंपनी कायद्याने लेखापरीक्षण सक्तीचे करण्यात आले. कंपनी कायद्यानुसार १९५६ लेखापरीक्षक आणि लेखापरीक्षण करणाऱ्या कंपन्यांवर अधिक बंधने आणि जबाबदाऱ्या देण्यात आल्या.   

नियम आणि कायद्यानुसार संस्थांची कार्यपद्धतीचे मूल्यांकन करणे व आर्थिक व्यवहारात पारदर्शकता आणणे, हा ऑडिटींगचा मूळ उद्देश आहे. संस्थेच्या लेखापरीक्षण अहवालाला (Audit Report) सनदी लेखापाल (Chartered Accountant) आणि लेखा परीक्षकाची अधिकृत मान्यता असणे आवश्यक आहे. 


या लेखामध्ये आम्ही तुम्हाला ऑडिटींग, लेखा परीक्षणाची वैशिष्ट्य, ऑडिटींगची प्रक्रिया, इत्यादींची माहिती देणार आहोत. त्यासाठी डाव्या बाजूवरील लिंक्सवर क्लिक करा.      


- महेश मोरे
अकाउंटंट 
प्रथम इन्फोटेक फाउंडेशन,
पत्ता – ७८/ए,कामगार नगर,
एस.जी.बर्वे मार्ग, कुर्ला (पूर्व)
मुंबई – ४०० ०२४
इ मेल –  
mahesh.more@pif.org.in

संकेतस्थळ -  www.pif.org.in 

 

 

3
सरासरी 3 (2 votes)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation