Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

अर्थशास्त्र

एक सर्वसामान्य माणूस आपल्या रोजच्या जीवनातील व्यवहारांना कसा हाताळतो, याचा अभ्यास करत त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करणारं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र असं प्रसिद्ध अर्थतज्ञ लायनल रोबिंस म्हणतो. आयुष्यात लागणारा पैसा तो कसा मिळवतो, त्याचा वापर तो कशाप्रकारे करतो आणि प्रत्येक माणसाच्या अशा वापराचे, व्यवहारांचे पडसाद राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरील अर्थव्यवस्थेवर कसे पडतात हे जाणून घ्यायचे असेल तर आधी अर्थशास्त्र म्हणजे काय हे समजून घेणं महत्वाचं ठरतं.

विविध सेवा-सुविधा, वस्तू यांचे निर्माण, वितरण आणि वापर यांचा अभ्यास म्हणजे अर्थशास्त्र होय. त्याचे दोन प्रकार पडतात. माईक्रोइकॉनॉमिक्स आणि मॅक्रोइकॉनॉमिक्स. माईक्रोइकॉनॉमिक्स मध्ये अर्थव्यवस्थेच्या मुलभूत घटकांचा अभ्यास केला जातो जसे की उत्पादक, ग्राहक आणि बाजारपेठ, या घटकांचा आपापसात होणारा व्यवहार इत्यादी समजते. तर मॅक्रोइकॉनॉमिक्स मध्ये या मुलभूत घटकांच्या व्यवहारांमुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेवर काय पडसाद उमटतात याचा अभ्यास होतो. तसेच महागाई, आर्थिक मंदी, बेकारी, राष्ट्रीय उत्पादन, सरकारची धोरण यामुळे अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होऊ शकतात याच अभ्यास यामध्ये होतो.

एखाद्या वस्तूची किंमत कशी ठरते, ती कधी वाढते कधी कमी होते आणि मग कशी स्थिरावते याचं सर्वात सोपं उदाहरण म्हणजे मागणी पुरवठा हे तत्व. एखाद्या वस्तूची मागणी वाढली की त्याची किंमत वाढते आणि मागणी कमी झाली की किंमतही कमी होते. पण ती बेसुमार वाढत नाही आणि अगदीच फार कमीही होत नसते. किंमत स्थिरावते त्याला समतोल म्हणतात. एक उदाहरण घ्या, समजा बाजारपेठेत कांद्याला खूप मागणी आहे  आणि पुरवठा कमी, त्यामुळे कांद्याच्या किमती वाढणार, जे कांद्याच उत्पादन करतात त्यांना भरपूर पैसा मिळणार. मग कांद्यात भरपूर पैसा आहे म्हणून अधिकाधिक शेतकरी कांदा उत्पादित करणार. परिणाम असं होणार की मागणीपेक्षाही पुरवठा जास्त होणार आणि किंमती कमी होणार आणि मग एका पातळीवर त्या स्थिरावणार.  

मागणी पुरवठा यासारखे अनेक तत्व अर्थव्यवस्थेत बदल घडवून आणत असतात. ते बदल समजून घेणं हे आपल्या हिताचा ठरतं म्हणून अर्थशास्त्र आणि संबधित संकल्पना समजून घेणं गरजेचं आहे. 

 

- अपूर्व देशमुख

 

 

3.166665
सरासरी 3.2 (6 votes)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation