Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

आर्थिक कायदे

नियम आणि नियमांची अंमलबजावणी म्हणजे ‘कायदा’ होय. लोकसभा आणि राज्यसभा या सभागृहांमध्ये कायदा सादर होऊन संसदेमध्ये तो संमत होतो. कायद्याला विधी-नियम म्हणून सुद्धा संबोधतात. कायदेशीर पद्धतीने वागले किंवा कायद्याची अंमलबजावणी केली की कुठल्याही समस्येतून मार्ग निघू शकतो.

समाजातील अनेक लोक कायद्यापासून चार हात लांब राहणेच पसंद करतात. कारण आकडा कायद्याच्या कचाट्यात सापडले कि त्यातून बाहेर पडणे सहज शक्य नसते. परंतु असे असले तरीही आपण कायद्याची थोडीफार का होईना माहिती करून घेणे आवश्यक असते. समाजात वावरताना बरेच वेळा अनवधानाने आपल्याकडून एखादी चूक होते आणि कायद्याचा धाक दाखवून यातून बाहेर पडण्यासाठी पोलिसांकडून अनेक वेळा आपली दिशाभूल केली जाते. असे प्रसंग टाळायचे असतील तर कायद्याचा अभ्यास असणे आवश्यक आहे.  

आर्थिक कायदा
आर्थिक कायद्यांतर्गत मिळकत (इनकम) कर, प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर, सेवा कर आदी संदर्भातील कायद्याची पूर्तता केलेली आहे. वरील कर आर्थिक क्षेत्राशी संबंधित असल्याने त्या संबंधीचे नियम व  आर्थिक कायद्या अंतर्गत मोडतात.

  • रिझर्व बॅंक ऑफ इंडिया कायदा १९३५ (RBI Act,1935)
  • सेबी : सिक्युरीटी अन्ड  एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडीया(SEBI)
  • एफ.एम.सी.(FMC)
  • आय.आर.डी.ए (IRDA) केंद्रीय विक्रीकर कायदा
  • आर्थिक क्षेत्र कायदा

इत्यादी आर्थिक कायदे अर्थकारणाशी आणि दैनंदिन व्यवहाराशी संबंधित आहेत. या कायद्यांची प्राथमिक माहिती जाणून घेणे आवश्यक आणि महत्त्वाचे आहे. हे प्रत्येक व्यक्तीच्या हिताचे आहे.

 

- प्रथमेश नारविलकर

 

2
सरासरी 2 (1 vote)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation