Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

कार्पोरेट गव्हर्नंस

कॉर्पोरेट गव्हर्नन्स ही एक संकल्पना आहे.कॉर्पोरेट गव्हर्नन्स शेअर मार्केटमधील लिस्टेड कंपन्यांसाठी असून कंपनीतले कायदे, नियम प्रक्रिया, योजना, संस्था  तत्वे आणि अधिकारांशी बांधिल असते. कंपनींच्या संचालक आणि मालकांनी सर्व कायदेशीर बाबींची काटेकोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे. कॉर्पोरेट गव्हर्नन्स हे सेबी : सिक्युरीटी अन्ड  एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडीयाच्या (SEBI: Securities & Exchange Board Of India) अंतर्गत येते.

शेअर बाजारात लिस्टमध्ये असलेल्या सर्व कंपन्याना कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या अटी आणि कॉर्पोरेट लों (Corporate Law)पाळणे बंधनकारक आहेत. कलम ४९ (Clause-49) मध्ये लिस्टेड कंपन्यांनी अटींबाबत माहिती दिलेली आहे. कंपन्यांचा आर्थिक ताळेबंद, कंपनीचे व्यवहार, कर्जे आदींची माहिती सेबीला देणे बंधनकारक आहे. कंपनीच्या प्रत्येक वार्षिक सर्वसाधारण सभेला भागधारकांना माहिती किंवा शंका असल्यास कंपनीच्या अध्यक्षाला आणि संचालकाला प्रश्न विचारू शकतात.

भागधारकांचे हित जपणे, संचालक मंडळाचे काम आणि  जबाबदार , सामाजिक मूल्ये (Ethics) जपणे, कंपनीच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता असणे ही तत्वे कॉर्पोरेट गव्हर्नन्सची असतात. अशाप्रकारे गुंतवणूकदारांना प्राधान्य देऊन कोणताही गैरव्यवहार होणार नाही, याची काळजी घेऊन नियम आणि कायद्याची अंमलबजावणी करणे, हे कॉर्पोरेट गव्हर्नन्सचे उद्दिष्ट आहे.  



- विनित मासावकर

 

1
सरासरी 1 (1 vote)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation