Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

अकाउंटिंग

जमा-खर्चाचा ताळेबंध आढावा घेणे. एखाद्या पदार्थाची किंवा वस्तूंची खरेदी आणि विक्री संबंधित पैशाचा तपशील या बाबींचा अकाउंटिंगमध्ये उल्लेख केला जातो. कार्यालय, व्यवसाय, नोकरी- उद्योग, घर-कुटुंब अशा सर्वच ठिकाणी याचा आपल्याला प्रत्यक्ष अनुभव येतो.

अकाऊंटिंग म्हणजे जमा आणि खर्चाचे नियंत्रण पत्रक होय. घरातल्या लहानातल्या लहान गोष्टीपासून ते जगातल्या मोठ्या उद्योग-धदयांमध्ये अकाऊंटिंगची गरज असते. पैशांच्या व्यवहाराचे सर्व बाबी या अकाऊंटिंगच्या माध्यमातून पूर्ण होतात. बॅंक. पतपेढी, संस्था, कंपनी, उद्योग, आदी ठिकाणी अकाऊंटिंग महत्त्वाची बाब मानली जाते. उदा. एखादी रक्कम बँकेतील खात्यात जमा झाल्यास अकाऊंटिंगमध्ये त्याला क्रेडीट (Credit) म्हणतात. बँकेतील रक्कम बँकेतील खात्यातून खर्च झाली तर त्याला डेबिट (Debit) म्हणतात. 

अकाऊंटिंगचे सर्वसाधारण ज्ञान महाविद्यालयातील वाणिज्य (Commerce) शाखेत मिळते. अकाऊंटिंगचे व्यावसायिक शिक्षणासाठी सनदी लेखापाल म्हणजेच चार्टर्ड अकाऊंट(सी. ए.) हा तीन वर्षाचा अभ्यासक्रम असतो. द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट ऑफ इंडिया मार्फत सी. ए. ची इत्यंभूत माहिती मिळते. जागतिक कंपनी, मोठे उद्योग, कंपनी इत्यादींसाठी सी. ए.ची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. संगणकावर अकाऊंटिंगसाठी ‘टेली’ हे सोफ्टवेअर वापरले जाते.  कुठल्याही प्रकल्पामध्ये अकाऊंटिंग महत्वाची भूमिका बजावते.

अकाऊंटिंगमध्ये ट्रेडिंग अकाऊंट, प्रोफिट अन्ड लॉस अकाऊंट, बेलन्स शीट या महत्वाच्या बाबी आहेत. दैनंदिन खर्चासाठी पेटी केश अकाऊंट असते. एखाद्या व्यवहार(खरेदी-विक्री) झाल्यास (Transaction) त्याची एन्ट्री जर्नल अकाऊंट आणि लेजर अकाऊंटमध्ये होते. अशाप्रकारे अकाऊंटिंगचे सर्व क्षेत्रात आवश्यकता वाढली आहे.  

 

- विनित मासावकर

 

1
सरासरी 1 (1 vote)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation