Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

करांचे प्रकार

कर

आपण ज्या सरकारी सेवा वापरतो, त्यासाठी आपल्याला टॅक्स भरावा लागणार कर म्हणजेच टॅक्स !

विविध करांबद्दल माहिती

पैसा उपलब्ध झाला तरच सरकार सामाजिक काम करू शकेल,त्यासाठी सरकारने जनतेवरती वेगवेगळ्या रुपात कर लावले आहेत, ज्यामुळे सरकारला पैसा मिळतो . असे कर हे आपण जे उत्पन मिळवतो, त्यावर किंवा विविध जीवन उपयोगी वस्तूंच्या खरेदीवर लावले जातात.म्हणूनच या करांचे दोन भाग पडतात

  • प्रत्यक्ष कर (डायरेक्ट  टॅक्स )
  • अप्रत्यक्ष कर (इनडायरेक्ट  टॅक्स )

या दोन्हीच्या माधमातून सरकार जनते कडून कर जमा करत असते.

प्रत्यक्ष कर (डायरेक्ट  टॅक्स ) म्हणजे काय
वर, बक्षिसावर बसवले जातात म्हणजे ज्या मिळणाऱ्या पैश्या वर दिले जातात ते सर्व परत्यक्ष कर आहेत. त्याच प्रमाणे ज्यासाठी  आपल्याला  प्रत्यक्ष पैसा द्यावा लागतो त्यांना प्रत्यक्ष कर म्हणतात. हे सर्व कर आपण सरकारला इनकम  टॅक्स च्या स्वरुपात देत असतो. सरकार कुठल्या व्यक्ती चे किती उत्पन आहे हे बघून कर ठरवत असते,आणि त्या नुसार आपल्याला ते भरावे लागतात. हे कर अगदी मोठया इंडस्ट्रीला ला हि भरावे लागतात त्याचप्रमाणे स्वतःचा व्यवसाय कार्नार्यानाही व्यवसायिक कर भरावा लागतो .

अप्रत्यक्ष कर (इन डायरेक्ट  टॅक्स ) म्हणजे काय
अप्रत्यक्ष कर म्हणजे जे कर आपण आपल्याला रोज च्या आयुष्यात लागणाऱ्या वस्तूंच्या माधमातून भारत असतो त्यांना अप्रत्यक्ष कर म्हणतात . म्हणजे हे कर आपण सरकारला डायरेक्ट देत नाही तर ते कर सरकार वस्तू वर लावते आणि आपण जेव्हा वस्तू विकत घेतो तेंव्हा  त्या वस्तुच्या  किमतीबरोबर  टॅक्सचे पैसे जोडलेले असतात ,जे आपण वस्तू खरेदी करताना  देतो. हे कर दिसत नाहीत, म्हणून त्यांना अप्रत्यक्ष कर म्हणतात.हे कर जीवनावश्यक वस्तू ,औषधे अशा  वस्तूवर लावण्यात येतात.

आपण दिलेले कर हे सरकारच्या उत्पन्नाचे साधन असते, म्हणून कर भरणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.

 

- अनघा पाटील

 

3
सरासरी 3 (5 votes)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation