Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

क्रेडीट

credit
सौजन्य: www.cardbhai.com

क्रेडीट म्हणजे ते पैसे जे तुम्हाला काढता आणि ते तुम्हालाच परत फेडायचे असतात.कोणी तुम्हाला पैसे देतो त्याचे पैसे व्याजासह परत केले पाहिजे. उधार परत करण्यासाठी एक मुदत दिलेली असते. व्याज म्हणजे या मुदतीची फी असते; जी उधार घेतल्यावर आकारली जाते. 

तुम्ही एखादं बँक खाते किंवा क्रेडीट युनियन खाते उघडले असेल आणि तुम्ही अर्थसंकल्पाचे काटेकोर पालन करीत असाल तर तुम्ही उधार घेऊन काम करण्यास काहीच हरकत नाही. अर्थसंकल्पाशिवाय क्रेडीट कार्ड किंवा कर्ज घेणं व्यर्थ आहे.

पेमेंट
तुम्ही पैसे योग्य वेळेत फेडले की ते तुमच्या क्रेडीट रिपोर्टवर दिसतात. तेच जर तुम्ही ते नाही केलं तर तर विलंब फी लावली जाईल आणि उशीरा भरलेले पैसे ही तुमच्या क्रेडीटवर येतील. तुमच्या क्रेडीट नोंदी तुम्ही जाल तिथे तुमचं पाठलाग करत असतात. त्या तुमच्या घर, गाडी, विद्यार्थी कर्ज यावर तर परिणाम करतात. शिवाय तुम्हाला व्यवसाय सुरु करण्यात ही अडचणी निर्माण करतात. असली कर्ज टाळण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तुमच्याकडे असलेले शॉप क्रेडीट कार्ड आणि बँक क्रेडीट कार्ड कमी करा. तुमच्याकडे जर क्रेडीट कार्ड असेल तर खरेदीला जाताना काही महत्त्वाची वस्तू घ्यायची ठरवल्याशिवाय आणि अर्थसंकल्पात तशी तरतूद केल्याशिवाय ते कार्ड सोबत नेऊ नका. क्रेडीट कार्ड जवळ असले की पैसे हातोहात खर्च होतात ज्याचा तुम्ही कधी विचारही केलेला नसतो. आणीबाणीच्यावेळी क्रेडीट फार मोठा आधार असतो. म्हणून क्रेडीटचा वापर योग्यप्रकारे केल्यास फायदेशीर ठरतो.

0
No votes yet
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation