Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

कर्ज

कर्ज म्हणजे एखाद्या व्यक्ती किंवा संस्था, बॅंक यांच्याकडून ठराविक मुदतीपर्यंत आपण पैसे घेतो आणि ते पैसे संबंधित व्यक्ती किंवा संस्थेस ठराविक व्याजासहीत परत करतो. कर्ज घेताना नेहमी विचार करावा की जे आपण कर्ज घेत आहोत, त्याची आवश्यकता आहे का ? आवश्यकता असल्यास आपण ती ठराविक मुदतीपर्यंत कर्जाची परतफेड करू शकणार आहोत की नाही, याचा व्यवहारीकपणे अभ्यास केला पाहिजे.

ज्या कारणासाठी आपण कर्ज घेत आहोत, त्या कर्जाशी संबंधित गोष्टीचा आपल्याला योग्य परतावा मिळणार आहे का ? कर्ज घेताना ‘व्याज’ ही गोष्ट महत्त्वाची आहे. कर्जासाठी संबंधित बँकांना काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते.व्यक्तीचे नाव, घराचा पत्ता, नोकरीचा पत्ता, पगाराची पावती, छायाचित्रे, साक्षीदार आदी कागदपत्रे द्यावी लागतात. सर्व कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतरच कर्ज दिले जाते. कर्ज हे व्यक्तिगत, शैक्षणिक, व्यवहारासाठी, वाहन खरेदीसाठी, घर विकत घेण्यासाठी अशा अनेक कारणांसाठी कर्जाची गरज भासते. कर्जासाठी घेतलेली रक्कम वेळच्यावेळी  परत केली नाही तर दंड भरावा लागतो.

जर आपण कर्ज परत करू शकलो नाही तर ज्या गोष्टींसाठी आपण कर्ज घेतले होते, त्यावर जप्ती येते. अशा प्रकारे कर्जाचे स्वरूप असते. कर्ज म्हणजे ती रक्कम जी नेमून दिलेल्या वेळेत आणि व्याजासह परत देण्याच्या बोलीवर करारावर काढली जाते. जी रक्कम तुम्ही उचलता तिला मुद्दल- (principal) म्हणतात, व्याज हे पैसे काढण्यावर लावलेली किंमत असते. ज्यावेळेत तुम्हाला हे पैसे फेडायचे असतात त्याला मुदत (Term) म्हणतात. 

मोठ्या खरेदीसाठी किंवा आत्यंतिक निकडीच्या वेळी कर्ज काढणं योग्य ठरेल. मोठं कर्ज किंवा अनेक कर्ज काढणं तुमच्यासाठी आर्थिक समस्येचं कारण होऊ शकेल. प्रत्येक महिन्याला हे फेडणं कठीण जाईल. 

कर्ज घेण्याचे फायदे आणि त्याची किंमत काय ?


- विनित मासावकर.

 

4
सरासरी 4 (1 vote)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation