Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

निवृत्तीसाठी बचत

निवृत्त जीवनाचा आनंद घेण्यासाठी आजच गुंतवणूक करा.
तुमच्या कार्यकाळातील ७० टक्के रक्कम ही तुमच्या निवृत्तीनंतर समाधानाने जीवन जगण्यासाठी आवश्यक असते हे तुम्हाला माहित आहे का ?

दूर कुठे फिरायला जाणं किंवा बोटीच्या डेकवरच्या खुर्चीत रेलून बसणं अशी स्वप्न बघण्याआधी तुमच्या घराचं भाडं, आहार, आरोग्य अशा मुलभूत गोष्टींचा विचार करा. तुमचे उद्देश वास्तवाला धरून असू द्या, त्याप्रमाणेच तुमची निवृत्तीचे  धोरण आखा.

निवृत्ती आधीच याची सुरुवात करणं कधीही चांगलच. पण अजून तुम्ही सुरुवात  केली नसेल तर तुम्ही आत्ताही बचत करू शकाल. यासाठी थोडं सर्जनशील व्हावं लागेल. तुम्ही जिथून निवृत्त होणार आहात तिथली मिळकत व इतर मिळकतीचा; अगदी तुमच्या राहत्या घराचा देखील निवृत्त जीवनशैलीसाठी विचार करा.

संकेतस्थळावरील ‘बी हाइव्ह’ केंद्रामध्ये सोनेरी भविष्यासाठी अधिक मार्गदर्शन तुम्हाला मिळेल. आरोग्यदायी आणि समाधानी आयुष्य जगण्यासाठी चांगल्या योजना कोणत्या हे जाणून घेण्यासाठी आमच्या साधनाचा वापर करा. निवृत्त जीवनासाठी शुभेच्छा !

4.166665
सरासरी 4.2 (6 votes)
तुमचे रेटिंग

YES

»
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation