Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

पशुधनाचे महत्त्व

भारतासारख्या शेतीप्रधान देशात शेतीची बहुतांश कामे जनावरांच्या मदतीने केली जातात. तसेच गायी व म्हशीसारख्या जनावरांच्या आधारे दुग्धव्यवसाय करता येत असल्याने भारतात पशुधनाला मोठे महत्त्व आहे. २००७ साली झालेल्या पशुगणनेनुसार महाराष्ट्रातील पशुधनाची संख्या ३६० लाख एवढी आहे. याचाच अर्थ राज्यात दर लाख लोकांमागे ३७,००० पेक्षा जास्त पशुधन आहे. 

पशुधनाचे उपयोग :- 

  • शेतीची कामे : नांगरणी, कुळवणी, पेरणी, कोळपणी, मळणी, यासारखी कामे करण्यासाठी पशुधनाचा वापर होतो. 
  • शेणखताचा पुरवठा : शेतीला लागणारे शेणखत तयार करण्यासाठी जनावरांच्या शेणाचा मोठा उपयोग होतो. शेणाच्या गोवऱ्या तसेच शेणापासून मिळणाऱ्या गोबर ग्यासचा वापर इंधन म्हणून केला जातो. 
  • मांसाहार : पशुधनाचा वापर मांस मिळविण्यासाठी होतो. भारतात ७५% मांस शेळ्यामेंढ्यापासून मिळते. 
  • दुग्धव्यवसाय : दुध हे पूर्णान्न समजले जाते व दुधाच्या व्यवसायात पशुधनाचा वाट मोठा आहे. 
  • वाहतूक : भारतात पशुधनाचा वापर शेतीमालाच्या तसेच इतर प्रकारच्या वाहतुकीसाठी केला जातो, कारण कोणत्याही प्रकारच्या रस्त्यावर बैल गाडी जाऊ शकते. 
  • इतर उपयोग : या शिवाय लोकर उत्पादन, चामडी उत्पादन तसेच इतर उत्पादनात पशुधनाचा मोठा वाट असतो. 

शेतीत पिकणाऱ्या प्रत्येक पिकाचा एकून उत्पादनांच्या घटकांमध्ये ८-४२% वाट जनावरांच्या श्रमाचा असतो. अशा प्रकारे भारतीय शेती व भारतीय अर्थव्यवस्थेत पशुधनाचे मोठे योगदान आहे. 

 

- सीताराम शरणांगत

 

3.5
सरासरी 3.5 (8 votes)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation