Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

जनावरांना होणारे रोग

गाई-म्हशींचा स्तनदाह :

गाई-म्हशींचा स्तनदाह हा एक असा रोग आहे जो कि जास्त दुध देणा-या जनावरांना भेडसावतो. या रोगामध्ये दुधाळ जनावरांचे सड सुजतात आणि दुधात  खराबी येते. कधी-कधी सड गरम देखील जाणवतात. 
 
या रोगाचे तीन प्रकार आढळतात :
  1. लक्षण रहीत रोग- या रोगाचे निधान दूधाचे परिक्षण केल्यावरच होते कारण या प्रकारच्या बाधेत स्तन सुजत नाहित किंवा दुधात कोणतीही खराबी दिसत नाही. हा रोग जास्त नुकसानदायक असतो.
  2. लक्षण सहीत रोग- या रोगबाधेत सडांची सुज, दूध नासणे (फाटणे) व पुष्कळदा दूध अतिशय पातळ आणि पिवळे इत्यादि लक्षणे आढळतात.
  3. जुनाट रोग- या रोगात जनावरांच्या सडांत रोगकारक जंतु दिर्घ काळ पर्यंत वास्तव्य करुन आपली संख्यात्मक वाढ करित असतात तथा दुध तयार करणा-या ग्रंथींचा नाश करतात. 

औषधोपचार :

हा रोग समजल्या बरोवर पशु चिकित्सकाशी तात्काळ संपर्क करुन आजारी जनावरांचा लवकर उपचार करायला हवा अन्यथा या बाधेत दुध तयार करणा-या पेशींमधे खराबी येते आणि दूध निर्मिती थांबते.

 
रोगनियंत्रण :
  • जनावरे आणि गोठे स्वच्छ ठेवा.
  • जनावरांच्या सडाला इजा होवू दऊ नका.
  • दूध काढण्यापूर्वी कास व सडांना स्वच्छ पाण्याने धुऊन काढा.
  • दूध काढण्यापूर्वी आपले हात स्वच्छ धुऊन घ्या.
  • ज्या सडात खराबी आहेत त्या सडाचे दुध शेवटी काढा व ते उपयोगात आणु नका.
  • दूध काढल्यानंतर सड जिवाणु रोधक (अँन्टीसैपटीक) द्रावण (पोलीसान- डी , सोडीयम   हाइपोक्लोराइड, अथवा क्लोरहैक्सीडीनच्या (सॅव्हलॉन) ०.५% द्रवणाने दररोज दूध दोहल्यानंतर टीट- डीप करायला हवे.
  • दूध दोहन पश्चात जनावर किमान अर्धा तास उभे राहिल याची दक्षता घ्या.

 

- स्वप्नील जोगी

 

2.833335
सरासरी 2.8 (6 votes)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation