Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

पूर्व प्राथमिक शिक्षण

पूर्व प्राथमिक

मुलांचा शालेय प्रवास पूर्व प्राथमिक शिक्षणापासून सुरू होतो. सध्या प्ले ग्रुप ते सीनिअर केजी या शालेय प्रवासाला पूर्व प्राथमिक शिक्षण असे म्हणतात. घराच्या सुरक्षित वातावरणातून मुले बाहेर पडण्याची ही पहिली वेळ असते. घरातील मंडळी सोडता कोणाशीही ओळख नसणारी मुले पूर्व प्राथमिक शाळेच्या निमित्ताने प्रथमच घराबाहेर पडतात. त्यामुळे शाळेच्या पहिला आठवडाभर मुलांना शाळेत रुळायला वेळ लागतो. त्यांना शिकविण्यासाठी, मुलांना शाळेची गोडी निर्माण करण्यासाठी शिक्षकांना पहिला महिनाभर खूप कष्ट घ्यावे लागतात. ही गोष्ट पालकांनी लक्षात ठेवली पाहिजे. त्याप्रमाणे शाळेला सहकार्य केले पाहिजे. शाळेत घातले, म्हणजे आपले मूल सगळ्या गोष्टी शिकलेच पाहिजे ही गोष्ट मनातून काढणे गरजेचे आहे. पूर्व प्राथमिक शाळेमध्ये मुलांच्या कुवतीचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. या दरम्यान मुलांना गाणी, गोष्टी, अक्षर आणि अंक ओळख करून दिली जाते. त्यासाठी विविध वस्तू, चित्रे, रंगीत मण्यांचा वापरले जातात. त्यामुळे मुलांची समजूत पक्की होते. गाणी म्हणण्यामुळे स्मरणशक्तीचा वापर करायला सुरुवात होते. शाळेमध्ये शाळा सुरू होण्याची, अभ्यासाची आणि खेळाची वेळ ठरलेली असते. शाळेचे नियम ठरलेले असतात. त्यामुळे मुलांना नियम आणि वेळाचे महत्त्व बालवयातच समजण्यास सुरुवात होते. 

शाळेतल्या शिक्षिका मुलांच्या वागण्यात सुधारणांची गरज असल्यास पालकांना सांगतात. अशा वेळी पालकांनी समजूतदारपणे वागले पाहिजे. सुधारणा सांगितल्या म्हणजे मुलात प्रॉब्लेम आहे असे नाही. ही गोष्ट पक्की लक्षात ठेवली पाहिजे. आपल्या अपेक्षा न लादता मुलांचा कल कशात आहे ही गोष्ट समजूनच पालकांनी वागले पाहिजे. याच शालेय कालावधीमध्ये मुलांना त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव होऊन, मते तयार व्हायला लागतात. त्यांना त्यांचे स्वतःचे जग निर्माण होऊ लागते. त्यामुळे पालकांनीही पूर्व प्राथमिक शाळा म्हणजे बुडवली तरी चालेल असा अप्रोच ठेवता कामा नये. कारण त्यातून मुलांच्या मनातही शिक्षणाविषयी असेच मत तयार होऊ शकते. तेव्हा पूर्व प्राथमिक शाळा म्हणजे मुलांच्या शैक्षणिक भविष्याचा पाया असतो ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. 

 

- अस्मिता भावे

 

0
No votes yet
तुमचे रेटिंग

nice

»
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation