Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

किरकोळ विक्री

किरकोळ विक्री

आजच्या धाव-पळीच्या जगात मानवाला स्वच्छ व ताजा भाजीपाला आहारात घेणं हे नित्याचेचं बनलं आहे. हा ताजा भाजीपाला शेतकरी ग्राहकाला रोजच्या रोज पुरवताना दिसतो. हा भाजीपाला आठवडे बाजार, शहरातील वेगवेगळया बाजारपेठा, मंडई, हातगाडी, काही भाजी विक्रेत्यांची दुकाने आहेत. त्याचबरोबर आज मॉलमध्येही आज किरकोळ विक्रीला असलेला ताजा भाजीपाला दिसून येतो.

किरकोळ विक्री वैशिष्ट्ये  

  • बाजारपेठ जवळच असल्यामुळे खर्च कमी येतो.
  • मालक स्वतःच माल विकत असल्यामुळे दलालाची गरज पडत नाही.
  • किरकोळ विक्रीच्या बाजारपेठेतून नेहमी ग्राहकाला ताजा भाजीपाला उपलब्ध होतो. 
  • शेतकऱ्याला किरकोळ विक्रीतून रोजच्या रोज पैसे उपलब्ध होतात.
  • किरकोळ विक्रीतून ग्राहकाला वेगवेगळया प्रकारच्या पालेभाज्या उपलब्ध होतात.

आज आपण पाहिलं तर असं दिसत की किरकोळ विक्रीच्या माध्यमातून मोठया प्रमाणावर पालेभाज्याची आवक - जावक केली जाते. म्हणून मोठया शहरांजवळचे छोटे- मोठे शेतकरी आपल्या शेतीत पालेभाज्यांचीच पिके घेताना दिसून येतात. जी खेडी शहरांपासून जवळ आहेत अशा खेडयांतूनही मोठया प्रमाणावर भाजीपाल्या पिकांची आवक - जावक केली जाते. यातून शेतकऱ्याला उत्पादनाचा चांगला नफा उपलब्ध होत असल्यामुळे आज बरेचसे शेतकरी आपल्या शेतीत भाजीपाला लागवड करताना दिसून येतात.

किरकोळ विक्रीतून आज टोमेटो, कोबी, फ्लॉवर, मिरची, ढोबळी मिरची, वांगी, कांदे, गाजर, मुळा, मेथी, पालक, शेवगा, घेवडा, कारले, बटाटा, वाटणा, लसून, कांदेपात, गवार, भेंडी, रताळी, बीटरुट, सलगम, सुरण, काकडी, पडवळ, दोडका, भोपळा, कलिंगड, खरबूज, दुधीभोपळा, घोसाळी, ढेमसे, खारीपेठा, तोंडली, छप्पन कद्दू, पालक, मेथी, चाकवत, माठ, आळू, कोथिंबीर, कधीलिंबु, वाल, लायमाबिन्स अशा वेगवेगळया प्रकारची भाजीपाल्यांची पिके मोठया प्रमाणावर घेतलेली दिसून येतात.

किरकोळ विक्रीच्या माध्यमातून ग्राहकांना ताजा भाजीपाला तर मिळतोय याचबरोबर शेतकऱ्यांना दररोज पैसेही उपलब्ध होतात. त्यामुळे अशा प्रकारच्या विक्रीतून शेतकऱ्याचे शेतीविषयक भांडवल सतत हलते राहण्यास त्यातून मदत होतानादिसते. 

    

 

- हरेश शेळके

 

3.25
सरासरी 3.3 (8 votes)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation