Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

शेळीपालन

बकरी पालन

 

भारतामध्ये विशेषतः ग्रामीण भागात अल्प भू – धारक, अत्यल्प भू – धारक, शेतमजूर व इतर गरीब कुटुंबे आपले आर्थिक जीवनमान सुधारण्यासाठी संकरित गायी पाळणे, कुक्कुटपालन यांसारखे जोड व्यवसाय करतात. शेळीपालन  हा त्यापैकी एक अत्यंत फायदेशीर पूरक व्यवसाय आहे. थोडया श्रमात जास्तीत जास्त आर्थिक लाभ मिळवून देणारा हा व्यवसाय आहे. 

शेळीपालनाची वैशिष्टये 

 • शेळी कुठल्याही हवामानात जगू शकते. विशेषतः उष्ण व कोरडया हवामानात शेळीची वाढचांगली होते. 
 • शेळीच्या आहारात मुख्यत्वेकरून झाडांचा पाला असतो. त्यात बाभूळ, चिंच, पिंपळ, शेवरी, बोर, अंजन यांचा समावेश होतो.
 • शेळीसाठी जागा कमी लागते. भांडवल कमी लागते. 
 • शेळीचा गर्भकाळ इतर दुभत्या पाळीव जनावरांच्या गर्भकाळापेक्षा कमी म्हणजे १५० दिवस इतक्या कालावधीचा असतो व भाकडकाळ कमी असतो.
 • शेळीचे दुध पचनास हलके असते व लहान मुलांना देण्यासाठी अधिक उपयुक्त असते. 
 • शेळीच्या लेंडीखताला सेंद्रीय खत म्हणून फार किंमत आहे. टाक शेळी वर्षाला २०० किलो लेंडीखत देते. 

शेळ्यांचे व्यवस्थापन 

 • शेळ्यांना मोठया गोठयांची आवश्यकता नसते. उसाचे पाचट किंवा गवत वापरून तयार केलेले छप्पर, ऊन वाऱ्यापासून आडोसा होण्याइतपत चार फुट उंचीची भिंत व त्या ठिकाणी खाद्याची व्यवस्था इत्यादी सोयी असलेला गोठा शेळ्यांकरिता उत्तम आहे. 
 • बंदिस्त जागा प्रत्येकी १२ चौ. फुट व मोकळी जागा प्रत्येकी २५ चौ. फुट असावी. 
 • खाद्याचे  प्रमाण साधारणतः प्रतिदिनी हिरवा चारा तीन – चार किलो, वाळलेला चारा राक किलो. टाक लीटर पेक्षा जादा दुध देणाऱ्या शेळ्यांना १०० ते २०० ग्रामपर्यंत खुराक देणे आवश्यक आहे. 
 • शेवरी, अंजन, हदगा, बाभूळ, सुबाभूळ, बोर, वड व पिंपळ झाडांचा पाला व फळे शेतीला आवडतात. 
 • प्रत्येक शेळीस दर दिवशी तीन ते चार लीटर पाणी प्यावयास लागते. 

करडांची जोपासना 

 • करडू जन्माला आल्यानंतर नाळ कापणे, नख्या कोरणे व सहा तासांच्या आत पहिले दुध पाजणे महत्वाचे आहे. 
 • करडू जन्माला आल्यानंतर पहिल्या २४ तासांत पिईल तेवढा चिक त्यास पिऊ देणे आवश्यक असते.
 • करडयाच्या वजनाच्या राक अष्टमांश इतका चीक प्रत्येक दिवशी त्यास पाजणे गरजेचे आहे.

म्हणून शेळीपालन कमी जोखमीचा आणि उत्तम आर्थिक लाभ मिळवून व्यवसाय देणारा आहे. 

 

 

-हरेश शेळके

 

 

3.62712
सरासरी 3.6 (59 votes)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation