Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

मत्स्यशेती

भारतात अगदी पूर्वीपासून मासेमारीचा व्यवसाय केला जातो. गोड्या व खाऱ्या पाण्यातील मासेमारीचा विचार करता, भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो. पुढील काही कारणांचा अभ्यास करता मासेमारी व्यवसायाचे महत्व लक्षात येण्यास मदत होते. 

मासे व्यवसायाचे महत्व 

  • मासेमारीसाठी असणारा वाव : भारताला सुमारे ७५१७ किमीचा, तर महाराष्ट्राला ७२० किमीचा समुद्रकिनारा लाभला आहे. देशात व राज्यात धरणांची संख्या जास्त असून त्या आधारे काढलेली कालव्यांची लांबीही लक्षणीय आहे. या सर्व बाबींचा वापर मासेमारीसाठी करता येऊ शकतो. 
  • जमीन व पाण्याची कमतरता : देशाची लोकसंख्या वरचे वर वाढत असून दरडोई जमिनीची व पाण्याची उपलब्धता झपाट्याने खालावत असल्याने, अन्नधान्याच्या गरजा केवळ जमीन व गोड्या पाण्याच्या आधारे भागवणे कठीण होत आहे. 
  • प्रथिनांचे प्रमाण : माशांनमध्ये केल्शियम, फोस्फरस, मेंगनिज, लोह, तांबे, फ्लोराईड तसेच आयोडीन आढळते, यामुळे मासेयुक्त आहार प्रथिनसमृद्ध समजला जातो. 
  • रोजगार : मासेमारीमुळे देशात एक कोटीपेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळाला असून, या व्यवसायात होत असलेल्या सुधारणा पाहता आणखी काही जणांना रोजगार दिला जाऊ शकतो. 
  • परकीय चलन : माशांचा उपयोग खाण्यासाठी, तेलासाठी, औषधे तयार करण्यासाठी तसेच उत्तम खते व कोंबडीचे खाद्य तयार करण्यासाठी होतो. यामुळे परकीय चलन मिळू शकते. वरील सर्व कारणांचा विचार करता मासेमारी व्यवसायाचे महत्त्व लक्षात येते. 

 

- सीताराम शरणांगत

 

3.63158
सरासरी 3.6 (19 votes)
तुमचे रेटिंग

mala kariar baddal mahiti pahije

»
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation