Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

दुग्धशाळा

दुग्धशाळा हा व्यवसाय दुधाशी संबंधित प्रक्रीयांशी निगडीत असतो. दुध नाशवंत असून ठराविक मर्यादेपर्यंत आणि तापमानात त्यावर प्रक्रिया केली जाते. 

 

दुधाची कमतरता व मागणी या समस्येतून राज्यातील दुग्धव्यवसाय सुरवात झाली, १९६७ साली नागरी पुरवठा विभागाच्या प्रशासकीय नियमाखाली मुंबई दुग्ध योजनेअंतर्गत ‘आरे’ कॉलनीची स्थापना करण्यात आली. दुग्धव्यवसायातील पहिला टप्पा म्हणून ‘आरे’ गवलीपाड्यात मे १९५१ मध्ये देशातील तसेच महाराष्ट्रतील पहिली प्रक्रिया करून बाटली बंद दुध भरण्याची दुग्धशाळा उभारण्यात आली. त्यामुळे मुंबईकरांना पाश्चरायीझ व बाटलीबंद दुध मिळू लागले.

महाराष्ट्रातील दुग्धशाळेची उद्दिष्टे - 

  • महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील दुधाचे उत्पादन व संकलन यात वाढ करणे.
  • शहरी भागातील ग्राहकांना रास्त भावाने सकस व स्वस्त दुधाचा पुरवण करणे.
  • शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करणे.
  • दुर्बल घटकांना रोजगार मिळवून देणे.
  • पशुपालन व्यवसायाला उत्तेजन देणे.
  • ग्रामीण भागाचा विकास करणे. इ. उद्दिष्टे लक्षात घेऊनच महाराष्ट्र शासनाने दुग्ध्शासानाने/ व्यवसायाला महत्त्व दिले आहे. अशा प्रकारे आपणाला दुग्धशाळा विषयीची प्राथमिक माहिती जाणून घेता येईल.


- हरेश शेळके

 

3.8
सरासरी 3.8 (5 votes)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation