Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

रेशीम शेती

रेशीम शेती: कमी भांडवलात हमखास उत्पन्न

रेशीम शेती हा शेतीस पूरक व्यवसाय असून तो अत्यंत कमी खर्चात व शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या साहित्यातून करता येतो. शेतकयांस कमीत कमी वेळेत जास्त उत्पन्न मिळवून देणारा हा व्यवसाय आहे. तुतीच्या झाडावर रेशमाच्या किड्यांची पैदास होत असते. अशा या उपयुक्त तुतीची लागवड निचरा होणाऱ्या कोणत्याही जमिनीत करता येते. 

एक एकर ऊस लागणाऱ्या पाण्यात 3 एकर तुती जोपासता येते. .तुतीची लागवड एकदा केल्यानंतर ते झाड साधारणतः 15 वर्षे पर्यंत जिवंत राहत असल्याने, दरवर्षी लागवड करावी लागत नाही त्यामुळे लागवडीचा खर्च इतर पिकां प्रमाणे वारंवार येत नाही. तुतीस एप्रिल, मे, महिन्यात पाणी मिळाले नाही तरी तुती मरत नाही. यामुळे आठमाही पाण्याची सोय असलेल्या शेतकयांस देखील हा व्यवसाय करता येतो. 

तुती बागेस रोग व किटक यांचा प्रार्दुभाव होत नसल्याने औषधोपचाराचा खर्च वाचतो. इतर शेती पिकां प्रमाणे यात पूर्ण व मोठया प्रमाणात नुकसान होत नाही. सुशिक्षीत बेरोजगारांना नोकऱ्यां शिवाय यात दरमहा उत्पन्न मिळविता येते.

 

- स्वप्नील जोगी

3.28
सरासरी 3.3 (25 votes)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation