Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

खते

खते

पिकांच्या योग्य वाढीसाठी पिकांना योग्य प्रमाणात पोषकद्रव्ये मिळणे आवश्यक असते. खतांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे 

 1. सेंद्रीय खते  
 2. हिरवळीचे खते  
 3. रासायनिक खते
 4. जैविक खते

इतर खतांच्या तुलनेत शेतीसाठी सेंद्रीय खते फारच उपकारक आहेत. वनस्पती आणि प्राण्यांच्या अवशेषांपासून मिळणा-या खातांना सेंद्रीय खते म्हणतात. सेंद्रीय खताचे फायदे पुढीलप्रमाणे:

 1. जमिनीचा पोत सुधारून तिची उत्पादन क्षमता टिकते व वाढते
 2. सेंद्रीय खतांच्या वापरामुळे पिकांच्या वाढीस आवश्यक असलेली सर्वच अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. 
 3. सेंद्रीय खतांमुळे अन्नद्रव्य पुरवठया बरोबरच मातीच्या कणांची घडण बदलून जमिनीचा पोत सुधारतो.
 4. सेंद्रीय खतांमुळे जमिनीत हवा खेळती राहते व जमिनीचे तापमान कमी राहते
 5. सेंद्रीय खतांमुळे जमिनीतील उपयुक्त जीवाणूच्या संखेत व कार्यक्षमतेत वाढ होते. त्यामुळे अन्नद्रव्याच्या उपलब्धतेत वाढ होते.
 6. सेंद्रीय खतांमुळे जमिनीची जलधारण क्षमता व निचाराशाक्ती सुधारते.
 7. सेंद्रीय खतांमुळे जमिनीच्या प्राकृतिक, रासायनिक व जैविक गुणधर्मांमध्ये सुधारणा घडून पीक उत्पादनात वाढ होते.

 

- हरेश शेळके 

3.4
सरासरी 3.4 (5 votes)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation