Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

पशुधन

महाराष्ट्रातील सुमारे ८१% गावे कोरडवाहू असून, बहुतेक शेती पावसावर आधारित आहे. त्यातच जमीन धारणेचे प्रमाण कमी असल्याने शेतीच्या कामात जनावरांचा वापर जास्त प्रमाणात करावा लागतो. राजस्थान, हरियाना, महाराष्ट्र, पंजाब यांसारख्या राज्यात उत्तम प्रतीचे पशुधन एकवटले असून भाकड जनावरांचे प्रमाणही मोठे आहे. पशुधन सुधारणा करण्यासाठी खालील उपाययोजना करण्याची गरज आहे. 

पशुधानामध्ये सुधारणा करण्याचे उपाय : 

  • भाकड जनावरांची व्यवस्था : भारतात धार्मिक कारणांमुळे भाकड जनावरांचा प्रश्न हाताळणे थोडेसे किचकट काम आहे. मात्र उपलब्ध साधन सामुग्रीच्या आधारे उत्पादनात भर घालण्यासाठी काही कटू निर्णय घेण्याची गरज आहे. 
  • वंश सुधारणेचा प्रयत्न : संकर पद्धतीचा वापर करून दोन वेगवेगळ्या वंशाच्या आधारे जास्त दुध देणाऱ्या गाई निर्माण करणे, उत्तम गुणांच्या नर मादीच्या मिलनातून तयार झालेल्या गर्भाचे साद्या मादीच्या गर्भात संवर्धन करणे, जनावरांच्या औषध उपचारांच्या सोयी निर्माण करणे यांसारख्य उपाययोजनांच्या आधारे वंश सुधारणा करता येते. 
  • चारा व्यवस्था : चाऱ्याची साठवण करून तो (मूरघास) तो हवा तेव्हा पुरवणे, कडब्याचे व भुश्याचे पावसापासून संरक्षण करणे, चराऊ रानांचा विकास करणे तसेच जनावरांना चारा कापून घालणे यांसारख्या उपायांमुळे चाऱ्याची बचत होते. तसेच दीर्घकाळापर्यंत चारा जपून ठेवता येतो. याशिवाय मिश्रशेतीचा अवलंब करणे तसेच  पशु प्रदर्शनाचे आयोजन करून पशुधनात सुधारणा करता येऊ शकते. 

 

- सीताराम शरणांगत

 

0
No votes yet
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation