Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

सिंचनातील पाण्याची काळजी

सिंचन

भारतातील शेती मान्सून पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे भारतात सर्वत्र कमी – जास्त प्रमाणात पाऊस पडत असतो. ज्या ठिकाणी पावसाचे प्रमाण अधिक असते तेथे पाण्याचा योग्य वापर न होता ते व्यर्थ जाते. अशा व्यर्थ पाण्याचा उपयोग पाण्याचा साठा करून पर्जन्य छायेच्या भागात सिंचनाच्या सहाय्याने करता येतो. त्यामुळे उन्हाळ्यात येणाऱ्या पाणी टंचाईच्या समस्येवर मत करता येते. 

जमिनीचा पोत आणि दर्जा टिकवणे
शेतीमध्ये सिंचनाचा वापर केल्याने शेतीस आवश्यक, मुबलक, योग्य ठिकाणी आणि समप्रमाणात पाण्याचा पुरवठा होत असतो. त्यामुळे जमिनीची सुपिकता वाढते तसेच जमिनीचा पोत आणि दर्जा टिकविण्यास मदत होते.

पाण्याची अपव्यय टाळणे 
शेतामध्ये पिकांना पाणी देताना शेतकरी ते पाटाने देतात. पिकांना पाणी देत असताना काही प्रमाणात पाणी जमिनीत मुरते त्याचप्रमाणे त्याचे बाष्पीभवन होत असते. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होतो. सिंचनाच्या वापराने पाण्याचा अपव्यय टाळणे सहज शक्य होते. आणि आवश्यक त्याच ठिकाणी पाणी पुरविले जाते व मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होते.

पिकांचे होणारे नुकसान टाळणे 
पिकांचे पाण्यावाचून किंवा पाण्याच्या अतिरेकापासून नुकसान टाळणे हा सिंचनाचा मोठा उद्देश असतो. सिंचनामुळे पाण्याचे योग्य प्रमाणात आवश्यक तेवढा पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे पिके सडणे, कुजणे, फळातील गोडी निघून जाणे अशा प्रकारांना आळा बसतो व  पिक व्यवस्थितरित्या पोसले जाते.

डोंगराळ भागात सिंचन क्षेत्र वाढवणे
डोंगराळ भागात केल्या जाणाऱ्या शेतीसाठी पाण्याचे व्यवस्थापन करणे खूप अवघड असते. या भागात जास्त पाऊस होऊनही उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवत असते. सिंचनामुळे अशाप्रकारच्या भागात पाणी व्यवस्थितरित्या पुरविले जाते.  

 

- चंद्रकांत शिंदे.

2.333335
सरासरी 2.3 (3 votes)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation